Tollywood Actor Dilip  
मनोरंजन

CBI अधिकाऱ्यांनाच धमकी: अभिनेता दिलीप क्राईम ब्रँच कार्यालयात

अभिनेता दिलीप आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांवर क्राईम ब्रँचनं (CBI) 9 जानेवारीला गुन्हा दाखल केला होता.

सकाळ डिजिटल टीम

Actress Assault Case: अभिनेता दिलीप आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांवर क्राईम ब्रँचनं (CBI) 9 जानेवारीला गुन्हा दाखल केला होता. एका ऑडिओ क्लिपच्या साह्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनाच धमकावल्याप्रकरणी दिलीप यांच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्या क्लिपमध्ये अभिनेता दिलीप हे एका अभिनेत्रीला मानसिक त्रास देत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. Actor Dileep reaches the Crime Branch office for the second consecutive day

आपल्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते खोट असून तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी धमकावले आणि त्यांना जीवे (Tollywood Actor) मारण्याची धमकी दिली असेही खोटे सांगण्यात आले आहे. माझ्याविरोधात हा डाव रचण्यात आला आहे. एकप्रकारे मला बदनाम करण्यासाठी हे सगळे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यानं ही गोष्ट आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही अभिनेता दिलीप यांच्याबद्दलच्या बातम्यांची चर्चा सुरु झाली आहे.

कोर्टामध्ये देखील याप्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामध्ये पोलिसांना त्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या आरोपींना 23,24 आणि 25 जानेवारीला क्राईम ब्रँच समोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आता पुढील सुनावणीसाठी 27 जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे. 2017 मध्ये एका मल्याळम अभिनेत्रीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप यांची चौकशी सुरु आहे. त्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच धमकावण्याचा प्रकार अभिनेत्याकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. केरळ उच्च न्यायालयानं याबाबत सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT