navya swami 
मनोरंजन

चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह; तातडीने थांबविले चित्रीकरण....

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : केंद्र व राज्य सरकारांच्या नियम व अटीनुसार चित्रीकरणास प्रारंभ झाला खरा. मात्र त्याचे वाईट परिणाम दिसायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आलेल्या वृत्तानुसार, तेलगु चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान चित्रपटाच्या अभिनेत्रीलाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण  युनिटमध्ये मोठी घबराट पसरली आहे. या वृत्तामुळे आता सदर फिल्मचे चित्रीकरण
तत्काळ थांबविले आहे.

प्रसिद्ध तेलगु अभिनेत्री नव्या स्वामी हिला तीन-चार दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. तिने कोरोनाची चाचणी केल्यावर तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यामुळे संपूर्ण युनिटमध्ये मोठी खळबळ उडाली. कारण सेटवर बऱ्याच संख्येने विविध विभागाचे सदस्य चित्रीकरणात सहभागी झालेले असतात. नव्या आणि सेटवरील चित्रीकरणातील थेट संपर्क येणाऱ्या व्यक्तींनाही आता क्वारंटाइन करण्यात आले आहे.

नव्याच्या घरून आलेल्या वृत्तानुसार, नव्या व तिची आई या घटनेने घाबरून गेल्या आहेत. त्यांना फिल्म इंडस्ट्री, चाहते, आप्तेष्ट यांच्याकडून धीर देण्याचे फोन व मेसेज येत आहेत. मात्र, नव्या यांना त्यांच्यामुळे सेटवरील अनेकांचे जीव धोक्यात घातले, अशी अपराधीपणाची भावना वाटत असल्याने स्वतःला ती अपराधी मानत आहे. या संपूर्ण प्रकरणाने एकूणच सर्व चित्रीकरणावर व सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत पुन्हा विचार करण्यास भाग पडण्याची गरज असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT