actress divya agarwal slams trolls who troll her for going back to work after father demise  
मनोरंजन

'माझी बिलं काय तुम्ही भरणार आहात का?', दिव्या संतापली 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वडिलांचे निधन झाल्यानंतर अभिनेत्री दिव्या अग्रवाल पुन्हा चित्रिकरणासाठी सेटवर आली होती. त्यावेळी ती काही कारणानं ट्रोल झाली होती. मात्र दिव्यानं ट्रोल करणा-यांना चांगलेच सुनावले आहे. दिव्या रिएलिटी शो मध्ये दिसली होती. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. तिनं आपल्या करिअरची सुरुवात रोडीजसारख्या कार्यक्रमांमधून केली होती. आता मोठी सेलिब्रेटी झाली आहे. एक डान्सर म्हणून इंडस्ट्रीमध्ये आलेल्या दिव्यानं मिस नवी मुंबईचा किताब आपल्या नावावर केला आहे. ती आता एक निर्माती आहे.

इ टाइम्सशी बोलताना तिनं सांगितले की, माझ्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर मी पुन्हा कामावर आल्यावर मला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. 2020 मध्ये वडिलांचे निधन झाले होते. मी जेव्हा माझ्या फोटोशुटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा अनेकांना त्याचा संबंध वडिलांच्या निधनाशी लावला होता. लोकांनी कसलाही विचार न करता मला नावं ठेवण्यास सुरुवात केली होती. मला हे माहिती आहे की, लोकं माझ्या घराची जबाबदारी घेणार नाहीत. घर चालवायला ते येणार नाहीत. अशावेळी मलाच काम करुन पैसे कमवावे लागणार आहेत.

लोकं काही केलं नाही तरी नावं ठेवतात. त्यांचे बोलणे मी काही जास्त मनावर घेत नाही. मला आता माझ्या परिवाराच्या मागे उभे राहायला हवे. घरातली बिलं भरायला लोकं येणार नाहीत. ती आपली आपल्याच भरायला लागणार आहेत. हे लक्षात ठेवायला हवं. कोण काय म्हणतं याला जर अवास्तव महत्व दिलं तर जगणं अवघड होईल. 

कोरोनामुळे दिव्याच्या वडिलांचे निधन झाले होते. दिव्यानं सांगितले की ती बॉयफ्रेंड वरुण सुद बरोबर राहते. जेव्हा मला वडिलांचे निधन झाल्याचे कळले तेव्हा मला त्यांना भेटायला परवानगी नाकारली होती. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT