Actress Kajol still scares her mother she said this in kon honar crorepati sakal
मनोरंजन

अभिनेत्री काजोल अजूनही घाबरते आईला.. काय आहे त्यामागचा भन्नाट किस्सा..

कोण होणार करोडपती या कार्यक्रमात अभिनेत्री काजोल आणि तिची आई तनुजा सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी काजोलने हा किस्सा सांगितला..

नीलेश अडसूळ

kajol and tanuja : बॉलिवडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) आणि त्यांची मुलगी अभिनेत्री काजोल (Kajol) या दोघी 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) च्या मंचावर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. ये दिल्लगी, करण अर्जुन, डीडीएलजे, गुप्‍त, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान आणि फना यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अध्यराज्य करणारी काजोल यावेळी चक्क मराठीतून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम 11 जून रोजी प्रदर्शित होणार असून या भागात काही भन्नाट किस्से पाहायला मिळणार आहेत. (Actress Kajol still scares her mother she said this in kon honar crorepati)

आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याने रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी तनुजा आणि काजोल ही मायलेकींची जोडी 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच विशेष अतिथी भागात सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने काजोलने एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. आपल्याला माहीत आहेच की काजोल ही अत्यंत स्पष्टवक्ती आहे. त्यामुळे बॉलीवूड मध्ये अनेकजण तिला घाबरून असतात. मात्र स्वतःचा दरारा निर्माण करणारी काजोल अजूनही आपल्या आईला घाबरते. यावर विश्वास बसणार नाही, पण हा किस्सा स्वतः काजोलने सांगितला.

काजोल म्हणाली, 'लहानपणी मी खूप मस्तीखोर होती. आईचं काहीच ऐकायची नाही. त्यामुळे मी आईच्या हातचा खूप मार खाल्ला आहे. आणि म्हणूनच आईने माझी रवानगी हॉस्टेलवर केली होती. या गोष्टीचा धसका मला अजूनही आहे. मी तिला प्रचंड घाबरते,' असे यावेळी काजोल म्हणाली. पाचगणीच्या शाळेतील शिक्षण, काजोलची वाचनाची तर तनुजाची विविध भाषा शिकण्याची आवड , निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर काम करण्याचा तनुजा यांचा अनुभव , काजोलच्या डोळ्यांचा किस्सा , काजोलच्या नावाची गंमत अशा अनेक गोष्टींचा उलगडा 'कोण होणार करोडपती'च्या या विशेष भागात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT