Actress Kangana Ranaut insta post-viral
Actress Kangana Ranaut insta post-viral  esakal
मनोरंजन

Prophet Muhammad Row: हिंदू असण्यावर गर्वच! कंगनाकडून आमिरच्या चित्रपटाचं उदाहरण

युगंधर ताजणे

Kangana Ranaut Reacts On Nupur Sharma- अभिनेत्री कंगनानं नुपूर शर्मा यांची बाजु घेतल्यानं नेटकऱ्यांनी कंगनावर टीका केली होती. यापूर्वी देखील कंगनानं (Nupur Sharma) अशाप्रकारे भूमिका घेऊन नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला होता. देशाच्या स्वातंत्र्यावरुनही कंगनानं केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर बराच (Social media viral news) काळ चर्चेत होतं. कायम वादात राहणं आवडणाऱ्या कंगनाला बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तर कंगनानच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला असून ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त (Kangana ranaut news) प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्याचे गंभीर पडसाद सोशल मीडियावर उमटले होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासुन देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नुपूर शर्मा यांच्या त्या प्रतिक्रियेचा कडाडून निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यावर सणसणीत टीकाही करण्यात आली आहे. देशातील अनेक पोलीस ठाण्यात शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. यासगळ्यात द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शर्मा यांच्यावर टीका करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले होते. कंगनानं देखील शर्मा यांची बाजु घेतली होती.

आता पुन्हा एकदा कंगना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. कंगनानं आपल्या प्रतिक्रियेमध्ये आपण हिंदू असून त्याचा आपल्याला गर्वच असल्याचे म्हटले आहे. शर्मा यांच्या पोस्टनंतर कंगनानं इंस्टावरुन काही पोस्ट केल्या होत्या. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. कंगनानं इंस्टावरुन पीकेचं पोस्टर शेयर केलं आहे. आमीर हा वॉशरुममध्ये असणाऱ्या शंकराच्या भूमिकेतील कलाकारासोबत आहे. या सीनचा फोटो शेयर करुन कंगनानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कंगना त्या पोस्टमध्ये लिहिते की, हे जे तुम्ही पाहता आहात त्यामुळे मला हिंदू होणं जास्त महत्वाचं वाटतं. ज्याप्रकारे या चित्रपटातून आपल्या देव देवतांचा अपमान करण्यात आला त्यामुळे मी आता अपमानित न होता वेगळ्या पद्धतीनं विचार करते आहे. माझ्या धार्मिकतेवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. असं लोकांना वाटते. पण ज्यावेळी एखादी महिला एखाद्या धर्मावरुन प्रतिक्रिया देते तेव्हा मात्र सगळा गदारोळ होतो. त्यावरुन वाद निर्माण केला जातो. याकडे कंगनानं लक्ष वेधले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT