From PM Modi To CM Shinde Kangana Ranaut appreciate them by sharing their fake photos  esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: फेक फोटो टाकून कंगना करते PM मोदी ते CM शिंदेंचं कौतुक

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चक्क पीएम मोदी ते सीएम शिंदेंचे फेक फोटो टाकत त्यांचं कौतुक केलंय.

सकाळ डिजिटल टीम

चित्रपटात दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना राणावत एखाद्या विषयावर तिचं मत मांडणार नाही असं क्वचितच घडतं. आतापर्यंत कंगनाच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी राजकारणात वादळ उठलं आहे. यावेळी कंगना काहीसं असंच करण्याच्या तयारीत दिसतेय. कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पीएम मोदी ते सीएम शिंदेंचे फेक फोटो टाकत त्यांचं कौतुक केलंय. (From PM Modi To CM Shinde Kangana Ranaut appreciate them by sharing their fake photos)

अभिनेत्री कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोशल मीडियावर वायरल झालेली एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम नरेंद्र मोदी, सीएम आदित्यानाथ आणि महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे यांचा जुना पण फेक फोटो लावलाय. हा फोटो फेक जरी असला तरी त्यात नरेंद्र मोदींचा पीएम व्हायच्या आधी ते जेव्हा एक कार्यकर्ता होते तेव्हाचा फोटो लावलाय. तर द्रौपदी मुर्मू यांचा त्या जेव्हा एक साधारण महिला होत्या तेव्हाच्या त्यांच्या परिस्थितीचा एक फेक फोटो दाखवलाय.

या वायरल कोलाजवर तिने, 'यांना बघून आश्चर्य वाटतं असंही लिहीलं आहे.सगळा नशिबाचा खेळ असतो. यालाच म्हणतात लोकशाहीचे चांगले दिवस.' असे लिहत तिने सोशल मीडियावरील वायरल पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

कंगना सध्या तिच्या इमरजंसी या चित्रपटात व्यस्त आहे. तिच्या या चित्रपटाचं दिग्दर्शनही तिच करतेय. कंगनाचा इमरजंसी चित्रपट येण्याआधीच मात्र या चित्रपटावर अनेक आरोप होत आहेत. या चित्रपटातील तिचं इंदिरा गांधींच्या भूमिकेतील लूक मात्र सर्वत्र चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT