actress kareena Kapoor khan said sanjay Leela bhansali ram Leela because she was not in mood  
मनोरंजन

'दुस-या अभिनेत्रींना संधी देणारी मी एकमेव' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - करिना कपूर सोशल मीडियावर ट्रेडिंग असणारा विषय आहे. सध्या तिच्या प्रेग्नंसीची चर्चा आहे. तिच्या वडिलांनी करिनाची ड्यु डेटही जाहीर केली होती. प्रेग्नंसीच्या काळात तिचे फोटोशुटही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता ती तिच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. करिनानं बॉलीवूडमध्ये मोठा टप्पा पार केला आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे.  तिला संजय लीला भन्साळीनं रामलीलाची ऑफर दिली होती. तेव्हा करिनानं ती नाकारली होती.

करिनानं भन्साळीची ती ऑफर का नाकारली याचे कारण एका मुलाखतीतून सांगितले आहे. भन्साळी यांचा रामलीला प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यात रणवीर आणि दीपिका प्रमुख भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई केली होती. त्या चित्रपटासाठी भन्साळी यांना करिनाला घ्यायचे होते. करिनाला त्यांनी पहिल्यांदा प्राधान्य दिले होते. चित्रिकरणाच्या केवळ दहा दिवस अगोदर करिनानं हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

संजय भन्साळी हे त्या चित्रपटासाठी कॅटरीना आणि प्रियंकाकडेही गेले होते. शेवटी त्यांनी दीपिकाला फायनल केले. त्यावेळी करिना आणि सैफच्या लग्नाची चर्चा सुरु असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी करिनानं सांगितले की, मला तो चित्रपट आवडला नाही. त्यामुळे मी तो करण्यास तयार नव्हते. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत करिनानं सांगितले की, मी तेव्हा वेड्यासारखा विचार केला होता. माझ्या सोबत असे बरेच वेळा झाले आहे. अनेक दिवसांनंतर मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप झाला होता. मला खरं तर रामलीला सारखा चित्रपट करायला हवा होता. नंतर माझे माईंड चेज झाले आणि मी गोरी तेरे प्यार में हा चित्रपट केला. 

करिना म्हणाली, माझं सगळं काम हे मूडवर असते. त्याचा मला अनेकदा तोटाही झाला आहे. मात्र जे झाले ते झाले आता त्याचा काही पश्चाताप नाही. मी आतापर्यत कित्येक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांनी मला संधी दिली. मात्र मला संजय लीला भन्साळी सारख्या दिग्दर्शकांबरोबर काम करता आले नाही. ती संधी मी गमावली. पण मला एक सांगायला आनंद वाटतो आहे की, मी एकमेव अभिनेत्री आहे की, जिनं कायम दुस-या अभिनेत्रींना काम करण्यासाठी संधी दिली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT