अभिनेत्री लिसा हेडन Lisa Haydon आणि तिचा पती डिनो लालवानी यांच्या घरी तिसऱ्या चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. लिसाने मुलीला जन्म दिला आहे. लिसाने अद्याप अधिकृतरित्या यासंबंधीची माहिती सोशल मीडियावर दिली नाही. मात्र एका नेटकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना तिने मुलगी झाल्याचं सांगितलं. 'तुझं तिसरं छोटंसं बाळ कुठे आहे?', असा प्रश्न नेटकऱ्याने लिसाला विचारला असता ती म्हणाली, 'माझ्या हातात.' (Actress Lisa Haydon Welcomes Third Child Announces Birth of Baby Girl in the Most Unique Way)
लिसाने या वर्षाच्या सुरुवातीला गरोदर असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर सांगितली होती. लिसाने व्यावसायिक डिनो लालवानीशी लग्न केलं असून या दोघांना दोन मुलं आहेत. जॅक आणि लिओ अशी या दोन मुलांची नावं आहेत.
लिसाने २०१० मध्ये 'आएशा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'क्वीन' या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. यामध्ये तिने कंगना राणावतच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहायक्क अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता. त्यानंतर 'हाऊसफुल ३' आणि 'ए दिल है मुश्कील' या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या. अभिनेत्रीसोबतच लिसा मॉडेल म्हणून फार प्रसिद्ध आहे. 'हार्पर बझार', 'ग्रेझिया', 'कॉस्मोपॉलिटन', 'वोग इंडिया', 'फेमिना इंडिया' यांसारख्या प्रसिद्ध मासिकांच्या कव्हरसाठी तिने फोटोशूट केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.