actress madhurani prabhulkar share experience with manu aai kuthe kay karte  SAKAL
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: "जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी असूनही ती...", मधुराणीने सांगितला 'मनू'सोबतचा अनुभव

मधुराणीने मालिकेतील छोट्या मनूसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला

Devendra Jadhav

Aai Kuthe Kay Karte News: 'आई कुठे काय करते' ही मराठी मनोरंजन विश्वातली आघाडीची अभिनेत्री. 'आई कुठे काय करते' मालिकेला गेली अनेक वर्ष लोकांचं प्रेम मिळालंय. मालिकेत अरुंधतीची प्रमुख भूमिका साकारत आहे अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर.

मधुराणी सोशल मीडियावर कायमच विविध पोस्टच्या माध्यमातून मालिकेबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. अशातच मधुराणीने मालिकेतली बालकलाकार म्हणजेच मनूची भूमिका साकारणाऱ्या जान्हवीचं कौतुक केलंय.

मधुराणीने जान्हवीसोबतचे फोटो पोस्ट करुन कॅप्शन लिहीलंय की, "मनू , अर्थात जान्हवी...काय सुंदर काम करते . आणि रोज आम्हाला थक्क करत असते
जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी...!

ह्या वयात तिचा तिच्या कामावर असणारा फोकस, निष्ठा ,प्रेम patience , लगन हे सगळं अवाक करणारं आहे. मी नुसतं तिला बघूनच तिच्याकडून किती गोष्टी रोज शिकत असते.
मला तिचं कौतुक वाटतंच पण खरं सांगायचं तर तिच्याप्रती एक प्रकारचा आदर वाटतो. आणि ते वाटणं अतिशय गोड वाटतं. We are blessed to have her in team AKKK."

मनूविषयी सांगायचं झालं तर.. तिचं नाव जान्हवी हरिसिंघानी. जान्हवीने याआधी कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेत गीताची भूमिका साकारली होती.

आई कुठे काय करते मालिकेत जान्हवी साकारत असलेल्या भूमिकेचं खुप कौतुक होतंय. जान्हवी ऑनस्क्रीन - ऑफस्क्रीन सर्वांची लाडकी आहे. जान्हवीच्या घरुन तिच्या अभिनय आवडीला प्रोत्साहन मिळत असून तिने फार कमी वयात मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT