Actress Meera Joshi accident in mumbai pune expressway car damage health update sakal
मनोरंजन

Meera Joshi Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अपघात..

अत्यंत भीषण असा हा अपघात मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर घडला आहे.

नीलेश अडसूळ

Meera Joshi Accident: मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक आणि चिंतेची वार्ता समोर आली आहे. एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात झाला आहे.

अनेक मालिका, रिएलिटी शो, चित्रपट अशा विविध माध्यमातून झळकणाऱ्या अभिनेत्री मीरा जोशी हिचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गवार अपघात झाला आहे. या संदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मिडियावर पोस्ट सह शेयर करत माहिती दिली आहे.

या अपघातात अभिनेत्रीला फारशी इजा झाली नसली तरी तिच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. तिची गाडी दुभाजकावर धडकल्याने गाडीला जबर फटका बसला आहे. अभिनेत्रीने गाडीचे काही फोटो आणि एक व्हिडिओ शेयर करत या अपघताची माहिती दिली आहे.

(Actress Meera Joshi accident in mumbai pune express way car damage health update)

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी(Meera Joshi) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसते. तीने आपल्या नृत्याने आणि हटके स्टाइलने चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनेत्रीच्या अपघातानंतर चाहत्यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे.

या अपघाता नंतर आपल्या गाडीसाठी तिने एक खास पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये तीने आपल्या गाडी सोबटचे काही क्षण एका व्हिडिओच्या माध्यमातून शेयर केले आहेत.

ज्यामध्ये मीरा जोशी म्हणते, 'प्रिय सखी.. किती आणि कुठे कुठे भटकलो ना गं आपण.. रात्र, दिवस, ऊन, वारा, पाऊस, चढ, उतार काहीही असो.. आपण दोघींनीही एकमेकींची काळजी घेतली.

'पण आज.. आज इतका भयंकर अपघात होऊनही तू स्वतःला संपवणं पत्करलं पण मला किरकोळ ओरखडाही येऊ दिला नाहीस तू.. थॅंक यू.. थॅंक यू व्हेरी मच.. प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. तब्बल 90 हजार मैलांचा आपला प्रवास.. आता विश्रांती घे.. लव्ह यू.. '

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT