Actress Nora Fatehi's Scooter video viral on social media esakal
मनोरंजन

Viral Video:आलिशान कारमधे फिरणारी नोरा नटून थटून स्कूटरवर का गेली?

कारमधे फिरणारी नोरा मात्र जेव्हा नटून थटून स्कूटरवर जाताना दिसली तेव्हा मात्र रस्त्यावरची लोकं नोराकडे वळून वळून बघतच राहिली.

सकाळ ऑनलाईन टीम

नोरा फतेहीच्या स्लीम ड्रीम फिगर आणि डान्सचे लाखो दिवाणे आहेत.तीने कुठे तीच्या मूव्जची झलक जरी दाखवली तरी त्याचा व्हिडिओ लगेच सोशल मिडियावर व्हायरल होतो.'बॅले' डान्सचे विशेष कौशल्या दाखवत नोराने कायम प्रेक्षकांची मनं जिंकत त्यांच्या मनावर राज्य केले आहे.वेगवेगळ्या कारमधे फिरणारी नोरा मात्र जेव्हा नटून थटून स्कूटरवर जाताना दिसली तेव्हा मात्र रस्त्यावरची लोकं नोराकडे वळून वळून बघतच राहिली.

इतर दिग्गज कलाकारांप्रमाणे नोरालाही महागड्या कारमधे फिरायला आवडते.आज मात्र नोरा जेव्हा कार सोडून स्कूटरवर जाताना दिसली तेव्हा साऱ्यांनाच तिच्याकडं बघून आश्चर्य वाटलं.सगळेजण तीच्याकडे वळून वळून बघत होते.ईदच्या दिवशी नोरा सुंदर पारंपारिक वेशात तयार होऊन बाहेर आली.कलाकार घराबाहेर पडलेत की कॅमेरा घेऊन कितीतरी लोकं यांची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी उभे असतात.(NORA FATEHI)नोराला तयार होऊन घराबाहेर पडताना बघूनही अनेकजण तीचे फोटोज काढण्यासाठी जमले होते.त्यावेळी तीचा स्कूटरवर बसून जातानाचा काढलेला एक व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्यात आला होता.काही वेळातच तो कमालीचा वायरल झाला.

या वायरल झालेल्या व्हिडिओमधे नोरा हिरव्या रंगाच्या एका ट्रॅडिशनल ड्रेसमधे घराबाहेर पडताना दिसते.(VIRAL VIDEO)घराबाहेर पडल्यानंतर नोरा कारमधे न बसता स्कूटरवर बसून जाताना दिसतेय.त्यावेळी तीथून चाललेले लोक नोराला वळून वळून बघताना दिसतात.नोराच्या स्कूटरवर बसून जाण्याचे नेमके कारण काय होते हे नोरालाच ठाऊक असणार.पण वायरल व्हिडिओ बघत कमेंटमधे अनेकांनी त्यांच्या ईच्छेनुसार निष्कर्श काढल्याचे व्हिडिओमधे दिसून येते.काहींनी हेल्मेट कुठे गेले?दिल्लीत असती तर पकडल्या गेली असती असे कमेंट केले आहेत.एकाने तर नोराला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे तर दुसऱ्याने नोराला डाऊन टू अर्थ म्हणत नोराचे कौतुक केले आहे.

नोराच्या डान्सने चित्रपटांतील गाण्यांनासुद्धा वेगळे वजन येते.तीच्या अदा लाखोंच्या मनाला घायाळ करते.नोराची एन्ट्री टेलिव्हिजन शोलाही हिट करणारी असते.नोराने तीच्या डान्सच्या कौशल्याने तीचा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे.ती कुठेही गेली तरी तीला आधी डान्स करून दाखवण्याची डिमान्ड केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT