actress priti zinta comeback bollywood movie lahore 1947 with aamir khan sunny deol  SAKAL
मनोरंजन

Priti Zinta: प्रिती झिंटाचं ६ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक, या सुपरस्टारसोबत झळकणार बिग बजेट सिनेमात

प्रिती झिंटा ६ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय

Devendra Jadhav

Priti Zinta News: बॉलिवूडमधील डिंपल गर्ल म्हणून प्रिती झिंटाला ओळखलं जातं. प्रितीला आपण 'दिल चाहता है', 'कल हो ना हो', 'वीर झारा' अशा अनेक सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय.

प्रिती IPL मध्ये पंजाब किंग्ज संघाची मालकीण आहे. प्रिती गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून काहीशी दूरच आहे. पण प्रितीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. प्रिती तब्बल ६ वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय.

(actress priti zinta comeback bollywood movie)

प्रिती झिंटा आगामी 'लाहोर 1947' चित्रपटात झळकणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असेल.

या चित्रपटात प्रितीसोबत अभिनेता सनी देओल प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय राजकुमार संतोषी या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून अनेक वर्षांनी संतोषी आणि आमिर खान एकत्र काम करत आहेत.

प्रीती 'लाहोर 1947' मध्ये विशेष भूमिकेत

बुधवारी 24 जानेवारी रोजी प्रीती झिंटा मुंबईतील एका स्टुडिओतून बाहेर पडताना दिसली. आज तकच्या रिपोर्ट्सनुसार प्रिती 'लाहोर 1947' च्या लुक टेस्टसाठी स्टुडिओमध्ये पोहोचली होती.

प्रीती या चित्रपटाद्वारे अनेक वर्षांनी सनी देओलसोबत पडद्यावर कमबॅक करणार आहे. सनी आणि प्रीती यांनी 'हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'फर्ज' आणि 'भैयाजी सुपरहिट' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

'गदर 2' नंतर सनी देओल 'लाहोर 1947' सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आमिर खान आणि संतोषी हे ''अंदाज अपना अपना' नंतर एकत्र काम करणार आहेत.

याशिवाय संतोषी आणि सनी देओलने यापूर्वी 'घायल', 'दामिनी' आणि 'घातक' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. आता प्रिती - सनी - आमिर खान यांच्या 'लाहोर 1947' ची उत्सुकता शिगेला आहे. हा सिनेमा २०२५ ला भेटीला येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 317 अंकांनी वाढला; ऑटो-फार्मामध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा अतरंगी टिझर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही समोर

Sangli Children : चौदा महिन्यांचा श्रवण व अडीच वर्षांचा करण खेळताना पाण्याच्या टाकीत डोकावले अन्..., आई घरकामात व्यस्त घडलं भयानक

चाहत्याच्या वागण्यामुळे राजामौली संतापले!

Heatwave Survey : ‘हिवताप’ सर्वेक्षण सातारा जिल्ह्यात गतिमान; डेंगीचे ५९, मलेरियाचे ३९, तर चिकनगुनियाचे १७ रुग्‍ण आढळले

SCROLL FOR NEXT