actress Priyanka chopra Team esakal
मनोरंजन

'लग्नाला दोन वर्षे झालीत, सध्या एवढचं सांगेन'...

हॉलीवूडमध्येही प्रियंकानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही प्रियंकानं (actress priyanka chopra ) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती तिकडची आता प्रसिध्द सेलिब्रेटी आहे. प्रियंका मोठी निर्मातीही झाली आहे. तिचा द व्हाईट टायगर (the white tiger) हा निर्मिती असलेला चित्रपट ऑस्करच्या (oscar) शर्यतीतही होता. मात्र त्याला ऑस्कर काही मिळू शकला नाही. प्रियंका आता चर्चेत आली आहे याचे कारण म्हणजे आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तिचं एका फॉरेनरसोबत लग्न हा त्यावेळी मोठा वादाचा विषय ठरला होता. मात्र प्रियंकानं आपल्या यशानं सर्वांची तोंड गप्प केली आहेत. (actress priyanka chopra opens up secret behind good marriage with nick jonas)

प्रियंका आणि निक हे दोघेही लोकप्रिय कपल आहे. (actress priyanka chopra marriage with nick jonas) 2018 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. राजस्थानातील जोधपूर या शहरात मोठ्या उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला होता. हे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पध्दतीनं झालं होतं. आपल्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत याविषयीची प्रियंकाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये आपल्या लग्नाविषयकच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रियंका सांगते, लग्नाचा वाढदिवस हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हा दिवस दोघांनी एकत्रितपणे साजरा करायचा असतो. असे मला वाटते. व्होग ऑस्ट्रेलिया या मासिकाशी बोलताना प्रियंका म्हणते, यशस्वी विवाहाचे कारण काय, असा प्रश्न जर मला विचारलं तर मी एवढेच सांगेल की आता माझ्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. सध्या मी इतकचं सांगु शकते. लग्नानंतर संवाद अधिक गरजेचा आहे. एकत्र बसणे, गप्पा मारणे आणि एकमेकांना वेळ देणे जमले की मग काही चिंता करण्याचे कारण नाही.

आमचं लग्न मोठ्या थाटामाठात झालं. मात्र त्यामागे अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती. आमच्याजवळ दोनच महिने होते. म्हणून आम्हाला शक्य तेवढं आम्ही केलं. तो लग्नासाठी बेस्ट टाईम होता. असे मला वाटते. असेही प्रियंकानं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT