actress priyanka chopra talks about her ex boyfriend relationship love past in bollywood sakal
मनोरंजन

Priyanka Chopra: पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी मीही.. प्रेम आणि भूतकाळाविषयी प्रियंकाचा मोठा खुलासा..

अभिनेत्रीच्या विधानाने आता चर्चेला उधाण..

नीलेश अडसूळ

Priyanka Chopra on past relationship : बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) कायमच चर्चेत असते.

आपल्या दैनंदिन आयुष्यात घडामोडींची माहिती ती आपल्याला चाहत्यांना देत असते. शिवाय मनोरंजन विश्वातील हालचालींवरही तिचे बारीक लक्ष असते. वेळ प्रसंगी ती सडेतोड टीकाही करत असते.

आपल्या कामामुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. मग ते तिचे भूतकाळातील प्रेमप्रकरण असो, हॉलीवुड अभिनेता निक जॉनस सोबतचे प्रेम आणि लग्न असो किंवा सरोगासी, तिची कायमच चर्चा राहिली आहे.

आता नुकतंच ती एका मुलाखतीत आपल्या भूतकाळातील प्रेमाविषयी बोलली आहे. एका पॉडकास्ट मध्ये तिने हा गंभीर खुलासा केला.

(actress priyanka chopra talks about her ex boyfriend relationship love past in bollywood)

प्रियांकाचे नाव आजपर्यंत बॉलीवूडमधील अक्षय कुमार, शाहरुख खान, हरमन बावेजा, शाहिद कपूर यांसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. आज त्याच नात्यासंबंधांवर तिने प्रकाश टाकला आहे.

एका मुलाखतीत प्रियांकाला विचारण्यात आले होते की, रोमँटिक जोडीदार निवडताना काही तुझी काही ठराविक अट असते का? किंवा तू कोणता पॅटर्न फॉलो करते का?.. यावर प्रियांका म्हणाली, ''मी एकामागून एक नात्यात अडकत राहिले. या प्रेम प्रकरणामुळे मी स्वतःला वेळ देणे बंद केले होते. मी ज्या कलाकारांसोबत काम केले किंवा सेटवर भेटले, त्यांना डेट केले. नाते कसे असावे हे मला माहीत असूनही माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनुसार मी स्वत्या साच्यात बसवत गेले.

पुढे प्रियंका म्हणाली की, 'प्रत्येक वेळी मी ती एकच चूक करत होते की, रिलेशनशिप मध्ये मी माझी नोकरी, माझी आवड आणि स्वतःला कधीच महत्त्व दिले नाही. एका क्षणाला तर माझी अवस्था पायपुसण्यासारखी झाली होती. कारण मी ज्या पार्श्वभूमीतून आले आहे, तिथे स्त्रियांना हेच शिकवले जाते. कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी, पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी, कामावरून घरी आल्यावर त्याला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला हे सगळे करावे लागते आणि मीही तेच करत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढे तिने निक आणि तिच्या नात्या बाबतही महत्वाचे भाष्य केले. ती म्हणाली, 'निक माझ्या आयुष्यात येण्याआधी ज्यांच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये होते त्यांच्यासोबत मी स्वतःलाच हरवून बसले आहे असे वाटत होते.

निकसोबत लग्न करण्यापूर्वी मी दोन वर्षांचा ब्रेक घेतला आणि मी आजवर काय चुका केल्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही समजून घेणार नाही. याची मला जाणीव झाली, असे प्रियांका या मुलाखतीत म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonar Lake Level: कमळजा मातेच्या मुखवट्याला पाण्याचा स्पर्श; लोणार सरोवरातील जलपातळी आणखी धोक्याच्या टप्प्यावर!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार

IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

Sushma Andhare : नगरसेवकांची पदे लिलावातच काढा; उमेदवारांना दिल्या धमक्या, अंधारे यांची भाजपवर टीका

Vote Counting Center Declare : पुण्यातील मतमोजणी केंद्रे जाहीर! तुमच्या भागातील मतमोजणी कोणत्या ठिकाणी होणार वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT