actress radha sagar shared video and announce her pregnancy good news sakal
मनोरंजन

Radha Sagar: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं बेबी बंप दाखवत दिली गुड न्यूज.. व्हिडिओ व्हायरल..

आज गुड न्यूज देण्यामागेही आहे एक खास कारण..

नीलेश अडसूळ

गेल्या नऊ वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली 'आई कुठे काय करते', 'सुंदरा मनामध्ये भरली' अशा दर्जेदार मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे राधा सागर. चंद्रमुखी चित्रपटातून देखील ती झळकली.

राधाने अनेक चित्रपटही केले आहेत. त्यामुळे खलनायकी भूमिका असतो असो विनोदी काम, राधा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावतेच. अशी राधा आता लवकरच आई होणार आहे.

राधाने नुकताच एक गोड व्हिडिओ शेयर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. राधाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

(actress radha sagar shared video and announce her pregnancy good news)

कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात प्रेक्षकांना खूप रस असतो. कारण कलाकार हा त्यांना आपल्याच घरातील भाग वाटत असल्याने त्यांच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी चाहते कायमच तयार असतात.

म्हणूनच सोशल मीडियावर कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कायमच चर्चा रंगताना दिसते. त्यातही कलाकारांचे लग्न आणि गुड न्यूज याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. अशी एक गुड न्यूज अभिनेत्री राधा सागरने दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी तिनं शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. त्यावेळी नेमकं कारण समजलं नव्हतं, पण आता त्याचं कारण उघड झालं आहे. राधाने एक सुंदर व्हिडीओ शेअर करत ती गरोदर असल्याची बातमी दिली आहे.

राधाने तिचा पती सागर कुलकर्णी याच्याबरोबर बेबी बंप दाखवत शूट केलं आहे. याचा सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेयर केला असून त्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

''माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे ..' असं ती यावेळी म्हणाली आहे. कारण आज राधाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त तिनं ही गोड बातमी तिने सगळ्यांबरोबर शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये ‘शून्य सावली दिवस’चा अनोखा अनुभव; सूर्य थेट डोक्यावर आल्याने काही क्षण सावलीच गायब

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT