rakhi sawant
rakhi sawant 
मनोरंजन

झोमॅटो डिलिव्हरी बॉयबद्दल राखीनं असं काही म्हटलं की नेटकरी म्हणाले 'खूप छान'!

सकाळन्यूजनेटवर्क

बॉलिवूडमध्ये कॉन्ट्रवर्सी क्विन म्हणून ओळखली जाणारी आभिनेत्री राखी सावंत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच झालेल्या 'बिग बॉस 15'मध्ये राखी टॉप 5 स्पर्धकांपैकी एक होती. बिग बॉसमधील राखीने धमाल मस्ती करून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.  झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या प्रकरणावर अनेक जण भाष्य करत आहेत. बंगळुरूमध्ये ऑर्डर रद्द केल्यामुळे तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपावरुन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला जामीन मिळाला. या प्रकरणावर भाष्य करत राखी सावंत म्हणाली, 'त्याच्यासोबत अन्याय झाला. मला खूप वाईट वाटलं.मित्रांनो झोमॅटोवाले किंवा डिलिव्हरीवाले तुमच्या घरी तुमचं पोट भरावं म्हणून येतात. त्यांचा आदर करा. त्यांना प्रेमाने वागणूक द्या. सगळीकडे कोरोनाची भीती असतानाही ते नोकरी करत आहेत. मी असं म्हणत नाही की त्यांना जेवायला द्या पण किमान त्यांना एक ग्लास पाणी तरी द्या. मी नेहमी त्यांना पाणी देते.आपण त्यांना थोडा आदर आणि प्रेम देऊचं शकतो. यासाठी आपल्याला टॅक्स तर भरावा लागत नाही.' राखीच्या या प्रतिक्रीयेला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राखीचे वेगळे रूप तिच्या चाहत्यांना पहायला मिळाले. 

झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कामराजने यावर प्रतिक्रिया देताने म्हटलं होतं की त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. या महिलेनेच मला मारहाण केली. यावेळी तिच्या हातातील अंगठी तिच्या नाकाला लागली आणि रक्त येऊ लागलं. असं कामराजचं म्हणणं आहे.

महिलेने मात्र  सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत डिलिव्हरी बॉयने मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी या प्रकरणात उडी मारत आपली मत व्यक्त केली.नुकतच परिणीती चोप्रानेदेखील एक ट्विट करत या डिलीवरी बॉयची चूक नसल्याचं म्हटलं होतं. यावरुन अभिनेत्री तनुश्री दत्ताने तरुणीची बाजू घेत परिणितीला सुनावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT