rutuja bagwe - prajakta mali sakal
मनोरंजन

Prajakta Mali News: अभिनेत्री ऋतुजा बागवेला आवडते प्राजक्ता माळी.. 'त्या' नात्याबाबत केला मोठा खुलासा..

Planet Marathi: अभिनेत्री ऋतुजा बागवेची प्राजक्ता माळी आहे लेडी क्रश, एका मुलाखतीत झालं उघड..

नीलेश अडसूळ

OTT Show: प्लॅनेट मराठीवर 'पटलं तर घ्या विथ जयंती' हा नवा चॅट शो सुरु झाला आहे. ज्याचे एकूण आठ भाग पहिल्या भागात रिलीज केले जाणार आहेत. याआधी या चॅट शो मध्ये सोनाली-आशय कुलकर्णी,अमृता खानविलकर-ओम राऊत आणि तेजस्विनी पंडित-अभिजित पानसे, पुष्कर श्रोत्री-संदीप पाठक या जोड्या येऊन गेल्या आहेत.

आता आगामी भागात अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि प्राजक्ता माळी सहभागी होणार आहे. ही जोडी या भागात धमाल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या भागात दोघींनी आपल्या पर्सनल आयुष्याविषयी बरंच काही या मुलाखतीत सांगितलं आहे.

सध्या या एपिसोडचा एक प्रोमो भलताच गाजतोय ज्यामध्ये दोघींनी लग्न, त्यांच्यातील नाते, ऋतुजाला खरच प्राजक्ता क्रश म्हणून आवडते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

प्राजक्ता माळी असंख्य मुलांची ड्रीमगर्ल आहे. त्याच जोडीने अनेक मुलींनाही ती आवडते. परंतु आता एक अशी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीची प्राजक्ता लेडी क्रश आहे.

ही अभिनेत्री आहे ऋतुजा बागवे. प्राजक्ता ऋतुजाची लेडी क्रश आहे आणि ही गोष्ट तिने प्राजक्तासमोर मान्य केली आहे. ऋतुजाला प्राजक्ताची लेस्बियन पार्टनर व्हायला आवडेल, हे सिक्रेट ऋतुजाने प्राजक्ता माळी आणि अख्या जगासमोर उघड केले आहे.

आता हे नेमकं काय प्रकरण आहे, हे तुम्हाला प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये शुक्रवारच्या म्हणजेच २४ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

या टॉक शोमध्ये प्राजक्ता माळीने शाहरुख खानसोबतचा एक किस्साही शेअर केला. ती एसआरकेला तब्बल १७ वेळा धडकली होती. आता ते कशासाठी हेसुद्धा प्राजक्ताने या शोमध्ये सांगितले आहे.

ऋतुजाला एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान ५१ हजार रुपयांचा चेक देण्यात आला होता. आता तो कोणता प्रयोग होता आणि हा चेक तिला का मिळाला? असे अनेक कायम स्मरणात राहणारे किस्से ऋतुजानेही शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT