actress scarlet johnson  team esakal
मनोरंजन

'ब्लॅक विडो' स्कार्लेट जॉन्सन डिझ्नीच्या विरोधात कोर्टात

हॉलीवूडमधील (hollywood) ज्या प्रख्यात अभिनेत्री आहेत त्यात स्कार्लेट जॉन्सनचं (scarlett johnson) नाव प्राधान्यक्रमानं घ्यावं लागेल.

युगंधर ताजणे

मुंबई - हॉलीवूडमधील (hollywood) ज्या प्रख्यात अभिनेत्री आहेत त्यात स्कार्लेट जॉन्सनचं (scarlett johnson) नाव प्राधान्यक्रमानं घ्यावं लागेल. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी स्कार्लेट ही सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या वेगवेगळ्या लुकमुळेही चर्चेत असते. आताही ती चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं जगातील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या विरोधात न्यायालयात घेतलेली धाव. यामुळे जॉन्सन सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. ब्लॅक विडोमध्ये (black widow) तिनं केलेल्या अभिनयामुळे ती सर्वांच्या पसंतीस उतरली होती. त्या चित्रपटामुळे तिला सर्वदूर प्रसिद्धी मिळाली. (actress scarlett johansson sues disney over black widow streaming release yst88)

आता स्कार्लेटनं ब्लॅक विडोच्या निर्मात्यांना कोर्टात आव्हानं दिलं आहे. या चित्रपटाचं वितरण डिस्नी हॉटस्टारनं केलं होतं. जोन्सनच्यावतीनं लॉस एंजेलिसच्या कोर्टात खटला सुरु आहे. डिझ्नीनं केवळ हा चित्रपट वितरण करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे तर स्कार्लेटबरोबर जो करार केला होता त्याचेही उल्लंघन केले आहे. डिझ्नीनं हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला होता. त्यामुळे या चित्रपटातून जे काही नुकसान झालं आहे त्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्नही स्कार्लेटनं विचारला आहे.

डिझ्नीनं आपली बाजु मांडताना ही गोष्ट दु;खदायक असल्याचे सांगितले आहे. मार्वलच्या सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये स्कार्लेट जॉन्सनचं ब्लॅक विडो नावाचं कॅरेक्टर संपुष्टात आले आहे. मात्र मार्वेल कॉमिक्सचे निर्माते केविन फाइजीनं हे कॅरेक्टर पुन्हा वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचे सांगितले होते. आता गेल्या वर्षी या चित्रपटाचे प्रॉडक्शन तयार झाले होते. आणि ती लॉस एंजेलिसमध्ये त्याच्या प्रदर्शनाची तयारीही पूर्ण झाली होती. या चित्रपटाचा प्रिमिअर हा चीनमध्ये करण्याची डिझ्नी हॉटस्टारची योजना होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT