sharmishtha raut, sharmishtha raut production house SAKAL
मनोरंजन

Sharmishtha Raut: अभिनेत्री आता होणार निर्माती.. शर्मिष्ठा राऊतने सुरु केलं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस

शर्मिष्ठा राऊत मराठी मनोरंजन क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहे

Devendra Jadhav

Sharmishtha Raut News: मराठी मनोरंजन सृष्टीतली एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. शर्मिष्ठा राऊत मराठी मनोरंजन क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. सध्या शर्मिष्ठा अबोली मालिकेत झळकत आहे. गेली अनेक वर्ष अभिनेत्री असलेली शर्मिष्ठा राऊत आता निर्माती होणार आहे. शर्मिष्ठाने स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. त्यामुळे आता शर्मिष्ठा राऊत निर्माती होणार आहे.

अभिनेत्री म्हणून शर्मिष्ठाची ओळख आणि चर्चा सगळीकडे असते. शर्मिष्ठाने आता निर्मिती संस्थेची घोषणा केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शर्मिष्ठाच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव अजून ठरलं नाहीये. पण या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून शर्मिष्ठा दर्जेदार मराठी मालिकांची निर्मिती करणार आहे. शर्मिष्ठाचा नवरा तेजस देसाई सुद्धा बायकोच्या या प्रॉडक्शन हाऊससाठी तिला खंबीर साथ देणार आहे.

शर्मिष्ठा राऊतला आपण जुळून येति रेशीमगाठी, सुखांच्या सरींनी हे मन बावरे, उंच माझा झोका अशा मालिकांमध्ये पाहिलंय. शर्मिष्ठा बिग बॉस मराठी २ मध्ये सुद्धा सहभागी होती. शर्मिष्ठाने तेजस देसाई सोबत अरेंज मॅरेज केलं. शर्मिष्ठा आणि तेजसची लव्हस्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. शर्मिष्ठा लोकप्रियता अभिनेत्री असूनही तिचं स्थळ आल्यावर तेजसला शर्मिष्ठा राऊत कोण हे माहित नव्हतं.

त्यानं तिचं कामही पाहिलं नव्हतं, पण पहिल्याच भेटीत तेजस शर्मिष्ठाच्या प्रेमात पडला आणि तसं त्यानं तिला सांगितलंही. पण त्यावेळी शर्मिष्ठानं विचार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला. कालांतरानं तिलाही तेजस आवडू लागला. या व्यक्तीबरोबर आपलं संपूर्ण आयुष्य आपण सुखात घालवू शकतो, हे जाणवल्यानंतर शर्मिष्ठानं तेजसला होकार दिला.

शर्मिष्ठा सध्या स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत अभिनय करत आहे. शर्मिष्ठा साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळत आहे. शर्मिष्ठा आता प्रॉडक्शन हाऊसचा शुभारंभ कधी करणार. याशिवाय शर्मिष्ठाच्या प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती कोणत्या मालिकेची असणार हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT