Kunal Khemu & Soha's video viral on social media  esakal
मनोरंजन

Viral Video: अभिनेता कुणाल खेमुनं खाल्ला बायकोचा मार!

सतत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारी जोडी अचानक राग व्यक्त करताना बघून तुम्ही देखिल चकीत व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

कुणाल खेमू आणि सोहा अली खान दोघेही सतत सोशल मीडियावर त्यांचे एकमेकांसोबतचे फोटोज आणि व्हिडिओज टाकत असतात.त्यांच्या या फोटोज आणि व्हिडिओजला प्रेक्षकांचा भारी प्रतिसाद मिळतो.त्यांची सतत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारी जोडी अचानक राग व्यक्त करताना बघून तुम्ही देखिल चकीत व्हाल.नेमकं काय कारण आहे या रागाला जाणून घेऊया.

नुकताच कुणालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट केलाय.तो व्हिडिओ बघून सुरुवातीला कोणालाही आश्चर्य वाटेल असा तो व्हिडिओ आहे.कुणाल झोपलेला असताना त्याला अचानक जाग येते.जाग येताच त्याच्यापुढे रागात असलेली सोहा असते.रागात सोहा कुणालला मारताना या व्हिडिओमधे दिसते.पण हा किस्सा जसा ऐकायला गंभीर वाटतोय तसा मुळात नाहीच आहे.कुणालने गमतीचा विषय म्हणून हा व्हिडिओ बनवलाय.ज्यामधे कुणालने सोहाबरोबरच एका चित्रपटाचे काही सीन्स त्यात टाकले आहेत.

कुणालने शेअर केलेला हा व्हिडिओ बघून तुम्हालाही पोट दुखेपर्यंत हसायला येणार आहे.बी टाऊनमधील सोहा कुणालची जोडी त्यांच्या एकमेकांच्या प्रेमासाठी कायम चर्चेत असते.त्यामुळे या व्हिडिओमधे सुरूवातीला सोहा कुणालला मारताना बघून प्रेक्षक चकितच झाले होते.पण असे काहीही नसून त्यांचे नाते तेवढेच प्रेमळ आहे.कुणाल आणि सोहाने गमतीने हा व्हिडिओ 'बदला' असे कॅप्शन टाकत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केला आहे.त्याचा हा व्हिडिओ तासाभरातच सोशल मीडियावर वायरल झालाय.सोहा आणि कुणाल दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाऊंटला हा मजेशीर व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय.अनेक बॉलीवूड सेलिब्रेटिजला देखिल हा व्हिडिओ बघून त्यांचे हसू आवरले नाही.त्यांनी सोहा आणि कुणालच्या इन्स्टाग्रामला कमेंट्स करत हसू व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT