vanita kharat, vanita kharat wedding, sumit londhe, vanita kharat love story SAKAL
मनोरंजन

Vanita Kharat Wedding: लॉकडाऊन, लुडो आणि तो.. अशी आहे वनिता खरात - सुमितची लव्हस्टोरी

वनिताने एकदम झक्कास पद्धतीने सुमीतच्या गळ्यात वरमाला घातली.

Devendra Jadhav

Vanita Kharat Wedding: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात काल २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वनिता खरातने एकदम थाटामाटात नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं. हास्यजत्रातील पृथ्वीक प्रताप आणि नम्रताचा नवरा योगेश संभेराव यांनी वनिताला लग्नात उचललं होतं. वनिताने एकदम झक्कास पद्धतीने सुमीतच्या गळ्यात वरमाला घातली. सुमीत आणि वनिताची लव्हस्टोरी जरा हटके आहे. चला पाहूया.

लॉकडाऊनच्या काळात जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं तेव्हा बरेच जण घरबसल्या लुडो गेम खेळून वेळ घालवत होते. वनिता सुद्धा या गोष्टीला अपवाद नव्हती. वनिता तिच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप सोबत लुडो खेळायची. सुमित तिचा आधीपासून मित्र होता. सुमित त्यांच्या ग्रुपचा एक भाग होता. हा सर्व ग्रुप मिळून लुडो खेळायचा. ग्रुपने लुडो खेळून झाल्यावर वनिता - सुमित काही वेळ दोघांमध्ये लुडो खेळायचे.

पुढे लॉकडाऊन संपल्यावर वनिता आणि सुमित यांनी एकमेकांची भेट घेतली. दोघांमध्ये छान मैत्री होतीच. आता बोलणंही सुरु झालं. पुढे दोघे पिकनिकला गेले. मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. वनिता मात्र तिच्या करिअरवर पूर्ण फोकस करणारी मुलगी होती. तिला रिलेशनशिप अशा गोष्टींसाठी अजिबात वेळ घालवायचा नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षी २०२२ मध्ये जानेवारीत दोघांनी ठरवलं कि पुढच्या वर्षी लग्न करायचं. आणि काल २०२३ ला जानेवारीत दोघांनी ठरलं तसं लग्न केलं.

वनिता खरात अभिनेत्री आहे हे सर्वांना माहीतच आहे.. पण सुमित काय करतो? सुमित हा आधी इव्हेंट मॅनेजमेंट करायचा. याशिवाय सध्या तो डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडरचं काम करतो. थिएट्रिकल या संस्थेचा तो फाउंडर आणि सी.ई.ओ आहे. अशाप्रकारे लॉकडाऊनमध्ये सुमित आणि वनिताची प्यारवाली लव्हस्टोरी जुळली.

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या लूकमध्ये ती दिसून आली. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली. अभिनेत्री प्राजक्ता माळीने दिलेल्या प्राजक्तराजच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचं सौंदर्य आणखी खुलून आलं. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला. वनिता व सुमितच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT