Actress Veena Kapoor found alive, complaint register against her death rumor Google
मनोरंजन

Crime: मुलाने हत्या करून नदीत फेकून दिलेली 'ती' दुसरीच, अभिनेत्री वीणा कपूर जिवंत...म्हणाल्या...

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वीणा कपूर यांच्या मुलाने त्यांची हत्या करून नदीत मृत शरीराची विल्हेवाट लावल्याची बातमी व्हायरल झाली होती.

प्रणाली मोरे

Actress Veena Kapoor found alive : काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की अभिनेत्री वीणा कपूर यांच्या मुलाने त्यांची हत्या केली आहे. बोललं गेलं होतं की त्यांच्या ४३ वर्षीय मुलाने त्यांची हत्या करून त्यांच्या मृत शरीराला नदीत फेकून दिलं. पण वीणा कपूर जिवंत आहेत हे मोठं सत्य समोर आलं आहे. त्यांनी आपल्याविषयी अतिशय घाणेरड्या पद्धतीनं पसरवलेल्या अफवेवर दुःखं व्यक्त करत याविषयी मुंबईत दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Actress Veena Kapoor found alive, complaint register against her death rumor)

वीणा कपूर यांच्या हत्येशी जोडलेलं नेमकं प्रकरण काय आहे,चला जाणून घेऊया. मुंबईच्या जुहू विभागात ही हत्या झाल्याचं समोर आलं होतं. ज्या महिलेची हत्या झाली तिचं नाव वीणा कपूर होतं. तिच्या मुलाचं नाव सचिन कपूर होतं ज्यानं तिला मारुन तिचा मृतदेह नदीत फेकून त्याची विल्हेवाट लावली होती. पण एकसारखे नाव असल्या कारणाने कन्फ्यूजन झाले आणि ती मृत महिला म्हणजे दुसरी कोणी नसून अभिनेत्री वीणा कपूर आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी देखील सोशल मीडियावर अभिनेत्री वीणा कपूर यांचे फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

लोकांनी फक्त वीणा कपूर यांना श्रद्धांजली वाहिली नाही तर त्यांच्या मुलाला देखील खूप वाईट पद्धतीनं सुनावलं. आता अभिनेत्री वीणा कपूर यांनी या प्रकरणात काही अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला आहे. वीणा कपूर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की,त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली गेली. आपल्या अजूनही लक्षात येत नाही हे कोणी आणि का केलं आहे. वीणा कपूर यांनी सांगितलं आहे की,त्या जिवंत आहेत. तरीदेखील अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यांच्या निधनाच्या काही पोस्ट देखील व्हायरल केल्या गेल्या असं त्या म्हणाल्या.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी यासंदर्भात संवाद साधताना त्या म्हणाल्या,''माझ्या मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यानं मला काम मिळणं बंद झालं आहे आणि याचा मला खूप मनःस्ताप देखील झाला आहे. यामुळे मी माझ्या कामावर देखील लक्ष केंद्रित करू शकत नाही''. वीणा कपूर पुढे म्हणाल्या,''मी जिवंत आहे आणि माझ्या मुलानं मला मारलेलं नाही''. तर त्यांचा मुलगा अभिषेक चड्ढानं देखील स्पष्टिकरण यासंदर्भात दिलं आहे.

अभिषेक म्हणाले की, ''मला खूप फोन आणि मेसेजेस आले. प्रत्येकजण मी आईला मारलं का हेच त्यात मला विचारत होता. ही बातमी ऐकून आपल्याला धक्का तर बसलाच आहे आणि आपण आजारी पडल्याचं देखील अभिषेक म्हणाले. आपलं आपल्या आईवर खूप प्रेम आहे आणि हा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही''.

अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या झाल्याचं समोर येताच प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहली यांनी देखील त्यावर दुःख व्यक्त केलं होतं. पण आता सगळं कन्फ्यूजन क्लीअर झालं आहे. अभिनेत्री वीणा कपूर जिवंत आहेत आणि चांगल्या देखील आहेत. पण आपल्याविषयी पसरलेल्या चुकीच्या बातम्यांनी मात्र त्यांना भलताच ताप झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT