actress Yami Gautam pregnancy rumours following the circulation of a viral video featuring her SAKAL
मनोरंजन

Yami Gautam Pregnancy: लग्नाच्या ३ वर्षानंतर यामी गरोदर? 'त्या' व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

लग्नाच्या ३ वर्षानंतर व्हायरल व्हिडीओमुळे यामी गरोदर असल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

Yami Gautam Pregnancy News: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतमने २०२३ मध्ये 'ओह माय गॉड 2' मध्ये वकिलाची भूमिका साकारून लक्षवेधी काम केलं.

यामीच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर तिने 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. आता लग्नाच्या 3 वर्षांनंतर यामी गरोदर असल्याची चर्चा आहे.

नुकतंच यामी - आदित्य यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. जो व्हिडीओ पाहून यामी गरोदर असल्याची चर्चा आहे.

यामीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओत आदित्य धर तिच्यासोबत पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसत होता. मात्र, यादरम्यान यामीने अशी एक कृती केली जी पाहून लोक ती प्रेग्नंट असल्याचे म्हणू लागले.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पापाराझींनी यामीला पाहताच तिचे फोटो अन् व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान यामी तिचा बेबी बंप दुपट्ट्याने लपवताना दिसली. आता यामीची ही स्टाईल पाहून ती प्रेग्नंट असून लोकांना कळू नये म्हणून तिने तिचा बेबी बंप लपवला, असा अंदाज लोक लावत आहेत.

एका यूजरने लिहिले की, "असं वाटतंय ती यामी आई होणार आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'बघा यामी प्रेग्नंट आहे.' आता जर ही बातमी खरी असेल तर यामीच्या चाहत्यांना याचा खूप आनंद होईल. यामीकडून मात्र कोणताही अधिकृत खुलासा झाला नाही.

यामी गौतमच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं तर... ती आगामी 'आर्टिकल 370' या सिनेमातून भेटीला येणार आहे. जिओ स्टुडिओज आणि ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ च्या मेकर्सकडून ‘आर्टिकल ३७०’ सिनेमाची निर्मिती करण्यात येतेय.

ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर यांची निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात यामीसोबत प्रियामणी झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT