actress yami gautami shares experience during her first debut movie Vicky donor  
मनोरंजन

'विकी डोनरमध्ये काम करते आहे,यामीनं पपांना सांगितले तेव्हा..'

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतमचा प्रवास हा विकी डोनर पासून सुरु झाला. त्यातील तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी स्वागत केले. मात्र या चित्रपटाच काम करण्यापूर्वी तिनं घरच्यांना जेव्हा सांगितले त्यावेळी तिला त्याचे आश्चर्यच वाटले. एका वेगळ्या विषयावर आधारित या चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराणानेही भूमिका केली होती. स्पर्म डोनेट सारख्या विषयावरील या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. समीक्षकांनीही त्याचे कौतूक केले होते.

यामी गौतम तिचा 32 वाढदिवस साजरा करत आहे. आता यामीनं आपल्या अभिनयानं वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणा-या यामीचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. विकी डोनरपासून तिच्या बॉलीवूडच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्या चित्रपटात तिच्यासोबत आयुषमान खुराणाही होता. यासगळ्याविषयी जेव्हा यामीला एका मुलाखतीत विचारण्याच आले तेव्हा तिनं विकी डोनर आणि आपल्या वडिलांची प्रतिक्रिया याबद्दल सांगितले. तो चित्रपट इन्फर्टिलिटी आणि स्पर्म डोनेशन या संकल्पनेवर आधारित होता.

बॉलीवूडमध्ये अशा प्रकारच्या विषयावर चित्रपट आलेला नव्हता. त्यामुळे त्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामी सांगते की, ज्यावेळी मी या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते तेव्हा कास्टिंग डिरेक्टरला त्याविषयी विचारले होते.

पण मला जेव्हा या चित्रपटासाठी साईन करण्यात आले तेव्हा कळले की त्याचा विषय काय आहे तो. मला खूपच हसु आले होते. त्यानंतर ती स्क्रिप्ट घेऊन मी घरी आले आणि त्याविषयी वडिलांना सांगितले. ते त्यावेळी त्यांनी ती वाचून 'यह काफी कूल है' अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. मलाही आश्चर्य वाटले होते. 

शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर यामी ही बदलापूर, काबिल, उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटांमध्ये झळकली. यामीचा नुकताच गिन्नी वेडस सन्नी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तिच्या जोडीला विक्रांत मैसी सहकलाकार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पवन कृपलानी हे करीत आहेत. 
 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Latest Maharashtra News Updates : आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT