actress Yuvika chaudhary Team esakal
मनोरंजन

जातीवाचक बोलणं युविकाला पडलं महागात...

मला त्या शब्दांचा अर्थ माहिती नव्हता, मागितली माफी

युगंधर ताजणे

मुंबई - टेलिव्हिजनवरील प्रसिध्द कॉमेडी सिरियल तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak mehata ka ulta chasma) या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्तानं (Munmun datta) एक पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी तिनं एक जातीय विधान केलं होतं. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. ट्रोलर्सकडून ती ट्रोलही झाली होती. आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. तिनंही जातीयवादी विधान केल्यानं तिला अटक करण्याची मागणी ट्रोलर्सनं केली आहे. अखेर तिला आपल्या वक्तव्यावरुन माफी मागावी लागली आहे. त्या अभिनेत्रीचं नाव युविका चौधरी (actress yuvika Choudhary ) असे आहे. (actress yuvika Choudhary Uses Casteist Slur In A Video After Arrest She Issues Apology)

युविकानं (actress yuvika Choudhary ) सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिनं एक जातीवाचक शब्द वापरला होता. त्यामुळे तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. तिनं जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यात दिसून येते की, ती आपल्या पतीकडून हेअर कटिंग करुन घेते आहे. तेव्हा युविका आपला फोन घेऊन येते. आणि आपला एक व्हिड़िओ तयार करु लागते. ज्यावेळी मी व्होग तयार करते तेव्हा मला मेकअपला फारसा वेळ मिळत नाही. त्यावेळी ती एक जातीवाचक शब्दांचा वापर करते. जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली.

actress yuvika chaudhari

युविका जे बोलली ते चूकीचे असून तिला अटक करावी अशी मागणी नेटक-यांनी केली आहे. आपल्या बोलण्यामुळे ज्यापध्दतीनं समाजात पडसाद उमटले त्यावरुन युविकानं माफी मागितली आहे. अखेर तिनं पुन्हा व्टिट करुन आपली चूक कबूल केली आहे. त्या व्टिटमध्ये ती म्हणते, मित्रांनो नमस्कार, मी जो शब्द वापरला त्याचा अर्थ मला माहिती नव्हता. त्यामुळे मी तुमची माफी मागते. मला कुणालाही दुखवायचे नव्हते. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. अशा शब्दांत युविकानं आपला माफीनामा पोस्ट केला आहे.

युविकाविषयी अधिक सांगायचे झाल्यास तिनं ओम शांती ओम (Om shanti Om) मध्ये डॉली अरोराची भूमिका केली होती. याशिवाय काही मालिकांमध्येही तिनं काम केले आहे. अस्तित्व एक प्रेम कहानी, कुमकुम भाग्य, अम्मा या मालिकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

Nagpur Farmers Protest: ''कर्जमाफीचं काय ते बोला'' शिष्टमंडळाची बोलती बंद, मुख्यमंत्र्यांसोबत होणार चर्चा

SCROLL FOR NEXT