Bappi Lahiri,Adah Sharma Google
मनोरंजन

दिवंगत बप्पी लाहिरींची खिल्ली उडवणारी अभिनेत्री गोत्यात;प्रकरण तापलं

बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्माला तिच्या पोस्टमधील अतरंगीपणा भलताच महाग पडला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा(Adah Sharma) नेहमीच तिचे अतरंगी फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तिचा हा अतरंगीपण जोपर्यंत तिच्यापर्यंत होता तोपर्यंत ठीक होता,पण तिनं त्याच्या सीमा ओलांडत आता थेट दिवंगत गायक-संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचा फोटो पोस्ट करत तो अतरंगीपणा करुन दाखवलाय. बरं,नुसतं फोटो पोस्ट करुन थांबली नाही त्यावरनं मस्करी करीत नेटकऱ्यांना एक सवालही केला. त्यामुळे सध्या अदा शर्मा ट्रोल होत आहे. अदा शर्मानं नेमंक केलंय काय हा प्रश्न आपल्या वाचकांच्या मनात नक्कीच पडला असेल.

तिनं आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक फोटो कोलाज शेअर केला आहे. ज्यात एका बाजूला 'गोल्डमॅन' च्या पेहरावात आपले लाडके गायक-संगीतकार बप्पी लाहिरी दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अदा दिसतेय. तिनं थेट बप्पी लाहिरी यांच्यासारख्याच अंगठ्या आपल्या हातातील बोटात घातल्या आहेत. फोटोतील त्यांच्या पोझसारखी हुबेहूब पोझ तिनं दिली आहे,आणि विचारलंय की,''कोणी अधिक चांगली ज्वेलरी घातली आहे?'' म्हणजे तिनं तिच्या फोटोला कॅप्शन दिलंय की,''Who wore it better?''. तिच्या या पोस्टवर नेटकरी मात्र भडकलेयत. अनेकांनी तिला फटकारलेलं दिसून येतंय. कुणी म्हणालंय,'हे तू चुकीचं केलं आहेस', तर कुणी म्हणालंय,'स्वतःची तुलना त्या दिग्गज व्यक्तीशी करू नकोस'. तर कुणी लिहिलंय,'तु हा फोटो पोस्ट करून बप्पी लाहिरी यांचा अनादर केला आहेस. कुणाच्या निधनानंतर ही अशी हास्यास्पद गोष्ट करणं तुला योग्य वाटतं का,लाज नाही वाटली हे करताना?'....

काही दिवसांपूर्वीच गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी यांना ज्वेलरी परिधान करण्याची आवड होती. त्यांना लाडानं सगळे 'गोल्डमॅन' देखील म्हणायचे. त्यांच्याविषयी,त्यांनी बॉलीवूडमध्ये आणलेल्या डिस्को या ट्रेंडविषयी अनेकांना कुतूहल आहे. आज त्यांच्या निधना नंतरही त्यांची गाणी रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यामुळे सिनेमात फार काही कमाल न दाखवणाऱ्या अदानं त्यांच्याविषयी अशी विनोदी पोस्ट करून काहीतरी बरळणं लोकांना पटलं नाही आणि त्यांनी तिला धारेवर धरलं. अदानं २००८ मध्ये '१९२०' या हॉरर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजारात विक्रीचा दबाव; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली; Meesho शेअर्स 5% ने घसरले

Delhi BJP Leader Video : "हिंदी शिक नाही तर चालता हो"... भाजपच्या महिल्या नेत्याची अफ्रिकन फुटबॉलपटूला धमकी, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : प्रशांत जगताप राजीनामा देण्याच्या तयारीत

तुमची जागा आमच्या पायाजवळ! Vaibhav Suryavanshi च्या कृतीने पाकड्यांचा जळफळाट; मोहसिन नक्वी, सर्फराज अहमदची रडारड, ICC कडे तक्रार

Kolhapur City : हद्दवाढीअभावी कोल्हापूरचा श्वास कोंडला; विकास, उत्पन्न आणि भवितव्य धोक्यात

SCROLL FOR NEXT