the kerala story, the kerala story full movie, adah sharma SAKAL
मनोरंजन

The Kerala Story: सुकलेले ओठ अन् त्याला पडलेल्या जखमा... शूटिंगदरम्यान अदाची झालेली भयानक अवस्था

द केरळ स्टोरी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अदा शर्माने तिला आलेल्या भयानक अनुभवाची कहाणी सर्वांना सांगितली

Devendra Jadhav

The Kerala Story Adah Sharma News: द केरळ स्टोरी सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. काही प्रेक्षकांचा कडवा विरोध होऊनही द केरळ स्टोरी सिनेमाने २०० कोटींच्या वर मजल मारली.

द केरळ स्टोरी सिनेमाची ज्वलंत कथा, कलाकारांचा दमदार अभिनय अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली. अशातच द केरळ स्टोरी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अदा शर्माने तिला आलेल्या भयानक अनुभवाची कहाणी सर्वांना सांगितली.

अदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चे द केरळ स्टोरी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अनेक फोटो शेअर केले आणि लिहिले, "#TheKeralaStory मधून, नंतर आणि आधी Sunkissed. अशा फाटलेल्या ओठांचे रहस्य…

40 तास उणे 16 डिग्री तापमानात स्वतःला डिहायड्रेट ठेवलं. याशिवाय पडण्याच्या सरावासाठी मागे गादी ठेवली होती असेही अदाने लिहिले आहे.

फोटोंमधील अदाची भयानक अवस्था बघून तिने सिनेमाच्या शूटिंगदरम्यान किती मेहनत घेतलीय हे दिसतंय.

द केरळ स्टोरी सिनेमा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या सिनेमानं रिलीज आधीपासून देशभरात गोंधळ घातला होता आणि त्याचे पडसाद जगभरात उमटलेले आपण पाहिले.

अर्थात केरळमधून ३२ हजार मुलींचं अचानक गायब होणं.. त्यामागचं धक्कातंत्र आणि त्याला असलेली दहशतवादाची पार्श्वभूमी एवढं सगळं सिनेमातून मांडल्यावर आणखी काय घडणार होतं.

पण एवढं सगळं सिनेमाच्या बाबतीत नकारात्मक घडूनही 'द केरळ स्टोरी' सिनेमानं बॉक्सऑफिसवर तगडी कमाई केली. २०-२५ करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं २०० करोडचा टप्पा गाठला यातच सिनेमाचं मोठं यश आलं.

'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या बाबतीत आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी एका मुलाखतीत द केरळ स्टोरी सिनेमाचा सीक्वेल येणार असल्याची मोठी हिंट दिली आहे.

विपुल शाह म्हणाले आहेत,''या सिनेमाची कथा अजून संपलेली नाही..अजून बरंच काही सांगायचं आहे. यावेळी आम्ही ते नक्कीच समोर आणायचा प्रयत्न करू. तुम्ही काळजी करू नका''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT