adipuruh movie shurpanakha will played marathi actress tejaswini pandit SAKAL
मनोरंजन

Adipurush Movie: आदिपुरुषमध्ये दिसली मराठमोळी शूर्पणखा.. पाहून तुम्हीही म्हणाल, कमाल

आदिपुरुष बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Movie News: आदिपुरुष सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. आदिपुरुष सिनेमा आज संपूर्ण भारतात रिलीज झालाय.

आदिपुरुष सिनेमाची आज सगळीकडे क्रेझ आहे. आदिपुरुष च्या ओपनिंगला आज जबरदस्त प्रतिसाद आहे.

सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका प्रभासने केलीय तर सीतेची भूमिका केलीय. तर लक्ष्मणच्या भूमिकेत आहे सनी सिंग. आता आदिपुरुष बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय.

(adipuruh movie shurpanakha will played marathi actress tejaswini pandit)

आदिपुरुष मध्ये मराठमोळा देवदत्त मागे रावणाची हनुमानाची भूमिका साकारतोय हे आपल्याला माहीतच आहे. आता आदिपुरुषबद्दल आणखी एक मोठी बातमी समोर आलीय.

ती म्हणजे... आदिपुरुषमध्ये शुर्पणखाच्या भूमिकेत एक मराठमोळी अभिनेत्री आहे. याचे अपडेट समोर आले आहेत. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित.

आदिपुरुषमध्ये मराठी कलाकार

आदिपुरुषमध्ये अभिनेता देवदत्त नागे पवनपुत्र हनुमानाची भूमिका साकारत आहे तर शूर्पणखाच्या भूमिकेत आहे तेजस्विनी पंडित.

तेजस्विनी पंडितने शूर्पणकाहची दमदार भूमिका साकारलीय. तर अभिनेत्री सोनाली कलवरकर सिनेमात कैकेयीची भूमिका साकारत आहे.

अशाप्रकारे मोठया कलाकारांच्या तोडीस तोड मराठमोळे कलाकार आदिपुरुषमध्ये झळकत आहेत. याशिवाय मराठमोळा अभिनेता रुपेश जाधव सिनेमात जांबवंताची भूमिका साकारतोय.

आदिपुरुष चित्रपटाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी निर्मात्यांनी कसलिच कसर सोडली नाही. निर्मात्यांनी रिलीजपूर्वी जाहीर केले होते की प्रत्येक चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक खूर्ची रिकामी ठेवली जाईल.

आता चित्रपटगृहांमधून भगवान हनुमानासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव जागेची अनेक छायाचित्रे समोर येत आहेत.

त्यातच एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला ज्यात एक माकडही थिएटरमध्ये पोहोचले होते. आता त्यातच आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याव्हिडिओत फोटो दिसत आहेत.

या फोटोला फुलांचा हार घालण्यात आला आहे. या फोटोनंतर आणखी काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले ज्यात असेच चित्र दिसत आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT