Ajit Pawar On Adipurush  esakal
मनोरंजन

Ajit Pawar On Adipurush : 'दादा तुम्हाला आदिपुरुषबद्दल काय वाटतं?', अजित पवारांनी कडक शब्दांत सुनावलं

सोशल मीडियावर हा चित्रपट अनेकांच्या टीकेचा विषय आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारे सडकून टीका करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Contorversy Ajit Pawar NCP Reaction Viral Social : आदिपुरुषवरुन सध्या वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले आहे. कुणी काही का म्हणेना पण जितक्या मोठ्या प्रमाणावर वाद होतो आहे तेवढ्याच प्रमाणात या चित्रपटाला प्रतिसादही मिळतो आहे. आतापर्यत या चित्रपटानं दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

आदिपुरुष प्रदर्शित होऊन चारच दिवस झाले आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाल केली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर हा चित्रपट अनेकांच्या टीकेचा विषय आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रकारे सडकून टीका करण्यात आली आहे. आतापर्यत टीव्ही मनोरंजन विश्वातील तसेच काही बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील या चित्रपटावर दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

यासगळ्यात विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा आदिपुरुषवरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. दादा हे नेहमीच त्यांच्या आक्रमक आणि परखड बोलण्याबद्दल ओळखले जातात. त्यामुळेच की काय पत्रकारांनी त्यांना आदिपुरुषवरुन प्रश्न विचारला आणि दादा बोलते झाले.

दादा, सध्या आदिपुरुष चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. आणि त्यावरुन वाद देखील होतोय. तुम्ही यासगळ्या बद्दल काय सांगाल, असा प्रश्न दादांना करण्यात आला होता. त्यावर त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्याला सणकून उत्तर दिलं आहे.

दादा संबंधित पत्रकाराला उत्तर देताना म्हणाले, अरे बाबा, असे सिनेमा आल्यानंतर त्यावरुन होणाऱ्या चर्चा कशाला करता, यापूर्वीदेखील त्या पठाणवरुन वाद झाला होता. पद्मावती चित्रपटावरुनही वाद झाला होता. हे चित्रपट देशपातळीवर चालण्याकरिता वाद होतात की काय, असा प्रश्न पडतो. त्याचा शोध घ्यायला हवा असे मला वाटते. अशी प्रतिक्रिया दादांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष हा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलेला विषय आहे. त्यावरुन वादही पेटला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. कलाकारांची भूमिका, त्यांच्या तोंडी असलेले संवाद, दिग्दर्शन आणि मांडणी याशिवाय काही तांत्रिक बाबींवरुन हा चित्रपट वादाचे कारण ठरतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT