Adipurush criticism saif ali khan by Marathi actress radhika deshpande from aai kuthe kay karte 
मनोरंजन

Adipurush: आदिपुरुषमधल्या रावणापेक्षा आमचा बालकलाकार बरा.. मराठी अभिनेत्रीची सणसणीत टीका

मराठी अभिनेत्रीने बालकलाकाराचं उदाहरण देत सैफ अली खानने साकारलेल्या रावणाची खिल्ली उडवली आहे.

Devendra Jadhav

Adipurush News: आदिपुरुष सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक कारणांमुळे प्रेक्षकांनी सिनेमाला ट्रोल केलंय. आदिपुरुष सिनेमाने वाद ओढवून घेतलाय. सिनेमात रामायणाचे असलेलं चित्रण प्रेक्षकांना खटकलंय.

आदिपुरुष मध्ये सगळ्यात चर्चा झाली ती म्हणजे लंकेश रावणाची. सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारलीय. पण याच रावणाला सुद्धा टीका सहन करावी लागतेय.

अशातच एका आई कुठे काय करते मधील एका मराठी अभिनेत्रीने बालकलाकाराचं उदाहरण देत सैफ अली खानने साकारलेल्या रावणाची खिल्ली उडवली आहे.

(Adipurush criticism saif ali khan by Marathi actress radhika deshpande from aai kuthe kay karte)

आई कुठे काय करते मालिकेत राधिकाने अरुंधतीच्या मैत्रीणीची भूमिका साकारली. अशातच तिने सैफ अली खानने साकारलेल्या रावणाची तुलना नाटकातल्या एका बालकलाकारासमोर केली.

राधिका लिहिते, 'रावण'च्या भूमिकेत समीर गुमास्ते आणि फोटोत आदिपुरुषचा सैफ अली खान. दोघांमध्ये वयाचाच नाही तर आणखी एका गोष्टीचा फरक आहे.

आमच्या समीरला रावणाच्या रूपात पाहण्यासाठी vfx ची गरज नाही. करोडो प्रेक्षकांची गरज आहे. असं म्हणत राधिकाने शेवटी सियावर रामचंद्र की जय हे नाटक पाहण्याचे आवाहन केलंय.

दरम्यान आदीपुरुष बद्दल एक नवी बातमी समोर आलीय. यासगळ्यात आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएननं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी केली आहे.

त्या निवेदनामध्ये काहीही झालं तरी आदिपुरुष या चित्रपटाचे शो तातडीनं थांबवण्याची मागणी केली आहे. या चित्रपटातून जे काही मांडण्यात आले आहे ते काही आमच्या मनातील रामायण नाही.

त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवून आणखी वाद निर्माण करण्यात येऊ नये. अशी मागणी त्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.

१६ जून रोजी आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून हा चित्रपट सातत्यानं सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

त्यातील कथा, भूमिका करणारे कलाकार, दिग्दर्शन, संवाद या साऱ्या गोष्टी वादाचे कारण ठरताना दिसत आहे.

यामुळे अनेकांनी त्याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. काही हिंदूत्ववादी संघटना, राजकीय पक्ष यांनी देखील आदिपुरुषबाबत तिखट प्रतिक्रिया देत या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कारवाई करण्यात यावी.असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT