Adipurush Director Om raut on Ravana Look,controveries and will he make changes in movie? Google
मनोरंजन

Adipurush Controversy: दिग्दर्शक ओम राऊतचा मोठा खुलासा; म्हणाला,'रावणाला असा लूक दिला कारण...'

'आदिपुरुष' सिनेमातील व्हीएफएक्सला खूपच लाथाडलं गेलं आहे लोकांकडून, तर सिनेमातील रावणाच्या लूकला देखील रीजेक्ट केलं गेलं आहे.

प्रणाली मोरे

Adipurush Controversy: ओम राऊत दिग्दर्शितआदिपुरुष सिनेमाची जेव्हा घोषणा झाली त्यानंतर सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर मात्र आदिपुरुषवर जोरदार ट्रोलिंगचा मारा केला जाऊ लागला. सर्वसामान्य नेटकरीच नाहीत तर मनोरंजनसृष्टीतूनही सिनेमावर टीका केली जातेय, सिनेमाच्या व्हीएफएक्सला खूपच लाथाडलं गेलं आहे लोकांकडून.तर सिनेमातील रावणाच्या लूकला देखील रीजेक्ट केलं गेलं आहे. (Adipurush Director Om raut on Ravana Look,controveries and will he make changes in movie?)

दिग्दर्शक ओम राऊची या सगळ्या वादानंतर प्रतिक्रिया आली होती की लोकांच्या 'आदिपुरुष' च्या टीझरवरील तीव्र प्रतिक्रियांमुळे तो अधिक दुखावला गेला आहे. आता पुन्हा त्यानं आणखी एका मुलाखतीत सांगितलं आहे की रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत देखील खूप प्रयोग केले गेले होते. त्यानं रावणाच्या लूकवर देखील वक्तव्य केलं आहे. ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमाविषयी त्याच्या टिझर रीलिज नंतर तरी काहीच चांगलं कानावर पडलेलं नाही.

ओम राऊतनं नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलेलं आहे, ''प्रभू रामचंद्रांवर माझी भक्ती आहे. त्यामुळे सिनेमात मी त्यांच्याप्रती काही चुकीचं दाखवेन असं होणार नाही. आम्ही इतिहासाची छेडछाड केलेली नाही. मला इतिहासाचा अभिमान आहे. मी रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका दूरदर्शनवर पाहिली आहे आणि त्या मालिकेनं माझ्यावर छाप सोडलेली आहे. तिचा माझ्यावर प्रभाव आहे. त्या काळात शूट केल्या गेलेल्या रामायणात देखील आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं होतं. आणि त्याकाळी लोकांनी ते पसंत केलं होतं. एक बाण धनुष्यातून सोडला की त्यातून दहा बाण सुटायचेआणि त्यातनं मग १०० बाण सुटायचे. त्या काळात आपण ते आधी कधी पाहिलं नव्हतं. आपल्याला त्याविषयी माहितही नव्हतं. पण तरिही त्या काळात लोकांनी ते डोक्यावर उचलून धरलं होतं''.

सिनेमातील रावणाच्या लूकवर ओम राऊत म्हणाला,''रावण एक राक्षस होता. तो खूप निर्दयी होता म्हणून त्याला मिश्यांचा लूक त्या काळात दिला होता. त्या काळातील राक्षसाची जी प्रतिमा होती ती मालिकेत दाखवली गेली होती. ती पद्धत, तो निर्णय त्या वेळच्या टीमचा होता. आमचा रावण हा आजच्या काळातला राक्षस आहे. माझ्या नजरेत एक राक्षस असाही दिसू शकतो''.

जेव्हा ओमला मुलाखतीत विचारलं गेलं की,'लोक टीझरला नावं ठेवत आहेत,तर तो सिनेमात काही बदल करणार का?' त्यावर तो म्हणाला, ''आम्हाला सिनेमासाठी सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे. कारण हा एक सिनेमा नाहीय आणि एक सिनेमा म्हणून आम्ही याकडे पाहतही नाही. आमच्यासाठी ही एक मोहीम आहे. आमच्या भक्तीचं हे प्रतिक आहे. लोक काहीही म्हणू देत,ते आमच्यासाठी कायम आदरस्थानीच राहणार. आम्ही सगळं पाहतोय. सिनेमा जानेवारीत रिलीज होतोय, पण जेव्हा तुम्ही सिनेमा पहाल,तेव्हा तुमच्या पदरी नक्कीच निराशा येणार नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT