Adipurush Memes Esakal
मनोरंजन

Adipurush Memes: हा तर मुघलांचा रावण अन्... आदिपुरुषच्या डायलॉग अन् लुकवर भन्नाट मिम्स व्हायरल

Vaishali Patil

Adipurush Memes: सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे.

आता हा चित्रपट रिलिज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर या चित्रपटाविषयी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रावणाच्या लूकपासून ते व्हीएफएक्सपर्यंत चित्रपटावर बरिच टिका होत आहे.

चित्रपटातील प्रभासच्या अभिनयाचे खूप कौतुक तर होत आहे मात्र चाहत्यांना आदिपुरुषमधला राम आणि बाहूबली हे सारखेच दिसत आहेत.

तर रावण बनलेल्या सैफ अली खानची देखील सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. सैफ अली खानसोबत दशनानच्या रुपात एक विनोद म्हणत आहेत. सोशल मीडियावर मजेशीर मीम्सचा आणि कमेंटचा पूरच आला आहे.

आदिपुरुषमध्ये सैफ अली खानचा रावणाचा लूक लोकांना आवडला नाही. त्याच्या हेअरस्टाईलपासून लांब दाढी आणि डोळ्यातील काजळपर्यंत लोकांनी त्याची खिल्ली उडवत आहेत. इतकच नाही तर त्याच्या लूकची तुलना मुघलांशी करण्यात आली आहे. रावणाने टि शर्ट घातला आहे.

तर रामाचं पात्र साकारणाऱ्या प्रभासवरही टिका होत आहे. रामाच्या चेहऱ्यावर तेजच दिसत नसून रामाच्या रुपाच प्रभास खुपच उदास दिसत असल्याच नेटकरी म्हणत आहे. तर एकानं रामानंद सागर स्वर्गातून आदिपुरुष बघताना असं म्हणत मीम देखील व्हायरल झालं आहे. तर एकानं इंद्रजितची तुलना चक्क उर्फी जावेदच्या कपड्यासोबत केली आहे.

एका युजरने ओम राऊतला टार्गेट करुन गँग्स ऑफ वासेपुर चा मीम शेअर केला आहे.

तर एकानं फिलिप्स ट्रिमरवर रावणाच्या फोटोसह मीम टाकलं आहे. रावणाच्या केस आणि दाढीची खिल्ली उडवली आहे.

तर एकानं लिहिलयं की रावणात लाखो पटीने वाईट होता मात्र तो हे काय विचित्रच आहे.

तर हनुमानाचा एक संवादही खुपच वादात अडकला आहे जो भगवान हनूमान बोलत आहेत. ते म्हणतात की, 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT