Adipurush Hanuman role actor devdatta gajanan nage know all about tanhaji star  Google
मनोरंजन

Adipurush: प्रभासच्या 'आदिपुरुष'मध्ये राम-रावण नाहीत,तर भाव खाऊन गेला हनुमान; मराठी अभिनेत्याचीच हवा

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'चा टीझर नुकताच रीलिज झाला अन् त्यातील हनुमानानं लक्ष वेधून घेतलं.

प्रणाली मोरे

Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'चा टीझर नुकताच रिलिज झाला आहे. २ ऑक्टोबरला खूप मोठा सोहळा पार पडला. रामायणावर आधारित असलेल्या या सिनेमाची पहीली झलक पाहिल्यानंतर लोकांना खूप काही नवीन पहायला मिळालं. रामाच्या भूमिकेत प्रभास,रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान, आणि सीतेच्या भूमिकेत कृती सनन आहे. तर, हनुमानही या टीझरमध्ये दिसले पण अनेकांना हनुमानाची भूमिका नेमकी कोणी साकारली आहे हे मात्र ओळखता आले नाही.

हनुमानाच्या शरीरावर बेल्ट असल्या कारणाने नेटकऱ्यांनी या वरनं सोशल मीडियावर मेकर्सना खूप सुनावलं. तसंच,हनुमान खूपच दुबळा आहे असं देखील बोललं जात आहे. या हनुमानाची तुलना दारा सिंग आणि इतर अभिनेत्यांशी केली जात आहे ज्यांनी हनुमानाची भूमिका याआधी साकारली आहे. चला, हा हनुमान नेमका कोणत्या अभिनेत्यानं साकारला आहे ते जाणून घेऊया.(Adipurush Hanuman role actor devdatta gajanan nage know all about tanhaji star)

प्रभास आणि कृती सेननच्या 'आदिपुरुष' सिनेमात हनुमानाची भूमिका साकारली आहे देवदत्त गजानन नागेनं, देवदत्त हा मराठी मालिकांमधला प्रसिद्ध चेहरा. त्यानं अनेक प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'जय मल्हार' या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारल्यानं तो घराघरात ओळखला जाऊ लागला. या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले.

देवदत्त नागेनं 'वीर शिवाजी', 'देवयानी','बाजीराव मस्तानी' सारख्या टी.व्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. देवदत्त हा महाराष्ट्रातील अलिबाग मध्ये राहणारा आहे. सध्या मुंबईत तो आपली पत्नी कांचन नागे हिच्यासोबत राहतो. ४१ वर्षीय देवदत्तने कलर्स वाहिनीवरील 'वीर शिवाजी' मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानं त्या मालिकेत तानाजी मालुसुरे ही व्यक्तिरेखा साकारली होती. याव्यतिरिक्त तो 'लागी तुझसे लगन' मध्ये देखील दिसला होता.

देवदत्तने स्टार प्रवाह वरील 'देवयानी मालिकेत' सम्राटराव विखे पाटील ही भूमिका साकारली होती. पण त्याला प्रसिद्धि मात्र 'जय मल्हार' या भूमिकेमुळे मिळाली होती. देवदत्तनं अनेक मराठी मालिकांमधनं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.

एका मुलाखतीत देवदत्तने 'आदिपुरुष' विषयी भाष्य केलं होतं. तो तेव्हा म्हणाला होता,''भगवान हनुमानाशी त्याचं स्पेशल कनेक्शन आहे. जेव्हा तो १७ वर्षांचा होता तेव्हा तो पहिल्यांदा जीममध्ये गेला होता. ज्या जिमचं नाव होतं,हनुमान व्यायाम शाळा. आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिकाही आपल्याला आपल्या शरीरयष्टीमुळे मिळाली असं तो म्हणाला होता. ही भूमिका केवळ भूमिका म्हणून नाही साकारली तर भक्तीभावही ती साकारताना मनात ठासून भरला होता'', असं देवदत्त म्हणाला.

देवदत्त सोशल मीडियावर सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर २५ हजारहून अधिक त्याचे फॉलोअर्स आहेत. तो नेहमीच आपले एकापेक्षा एक स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो अनेकदा जीम मध्ये व्यायाम करत घाम गाळतानाचे त्याचे व्हिडीओ देखील तो शेअर करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT