Adipurush Star Cast Fees Esakal
मनोरंजन

Adipurush Star Cast Fees: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आदिपुरुषमधील कलाकारांनी घेतली बक्कळ फी...जाणून घ्या

Vaishali Patil

Adipurush Star Cast Fees: 'आदिपुरुष' हा असा चित्रपट आहे ज्याच्यावरुन सुरु झालेला वाद हा काही केल्या थांबण्याच नाव घेत नाही आहे. सुरवातीला टिझर रिलिज झाल्यावरच बराच वाद झाला. त्यानंतर या चित्रपटाचं पोस्टर रिलिज झालं. ते पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या चित्रपटावर खुपच टिका केली. इतकच नाही तर या चित्रपटातील निर्माते आणि कलाकरांविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे.

भूषण कुमार निर्मित 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून 2023 अवघ्या काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे. तर आता 13 जून रोजी न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार असल्याची माहिती आहे.

या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचं टिझर रिलिज झालं तेव्हा काही मिनिटांच्या टिझरमध्ये प्रेक्षकांनी खंडीभर चुका काढल्या. त्यानंतर या चित्रपटात अनेक बदल करण्यात आले आहेत.

हा एक भव्य दिव्य असा चित्रपट असेल ज्यात मोठ्या प्रमाणात VFX वापरले जाणार आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयापासून ते कथेपर्यंत सर्व काही पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. खुप तगड्या बजेटमध्ये हा चित्रपट रिलिज करण्यात येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'आदिपुरुष' चित्रपटाचे एकूण बजेट 500 कोटींच्या जवळपास असल्याच बोललं जात आहे.

हे तर झालं चित्रपटाच्या बजेट बद्दल आता या चित्रपटात महत्वाच्या भुमिका साकरणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळालयं याचे देखील आकडे समोर आले आहेत .

निर्मात्यांनी चित्रपटात दिसलेल्या महत्त्वाच्या पात्रांना किती फीस दिली आहे. याची चर्चा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटात भगवान श्री रामची भूमिका साकारणाऱ्या प्रभासला या चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मिळाले आहेत.

या चित्रपटात माता सीतेच्या महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. क्रितीला या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये मिळाले आहेत. क्रितीचा या चित्रपटातील भुमिका आणि लूक तिच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. तर रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानला या चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मिळाले आहेत. आदिपुरुषमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सनी सिंगला 1.5 कोटी रुपये मिळाले आहे, असा दावा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता फक्त गरजेचाच माल आयात होणार! अनावश्यक विदेशी वस्तूंवर सरकार बंदी घालणार; व्यापार तूट कमी करण्यासाठी मास्टरप्लॅन

Mumbai Bogus Birth Certificates : मुंबई महापालिकेत ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आरोप

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार भाकरी फिरवणार, अजित दादांचे २२ आमदार गुप्त भेटले?; पटेल -तटकरेंनीही घेतली भेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

VIDEO : देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटतायेत..राहुल गांधींचा हल्लाबोल, 'त्या' व्हिडीओवरून केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT