adipurush not release imax theatre in india fans upset  SAKAL
मनोरंजन

Adipurush Movie: जबर धक्का! रिलीजला काहीच दिवस बाकी असताना आदिपुरुष बद्दल वाईट बातमी आली समोर

आदिपुरुष बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय त्यामुळे भारतातल्या तमाम फॅन्सची निराशा झालीय.

Devendra Jadhav

Adipurush Not Release in IMAX News: १६ जूनला आदिपुरुषच्या रिलीजचं बिगुल वाजलंय. आदिपुरुषच्या रिलीजची सर्वांना उत्सुकता आहे. भारतातले तमाम फॅन्स आदिपुरुष पाहायला उत्सुक आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमात प्रभास श्रीराम साकारत आहेत तर क्रिती सेनन सीतेची भूमिका रंगवत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमंताची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान आहे रावण.

आता आदिपुरुष बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय त्यामुळे भारतातल्या तमाम फॅन्सची निराशा झालीय.

(adipurush not release imax theatre in india fans upset)

IMAX मध्ये रिलीज होणार नाही

आदिपुरुष 16 जून रोजी प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. पण आदिपुरुष चित्रपटगृहात IMAX मध्ये रिलीज होणार नाही अशी बातमी समोर आलीय.

DC चा सुपरहिरो सिनेमा, द फ्लॅश, त्याच तारखेला म्हणजेच १६ जूनला प्रदर्शित होत आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सने भारतातील IMAX स्क्रीन आधीच ब्लॉक केल्या होत्या.

त्यामुळे, भारतातील चित्रपटगृहे IMAX स्वरूपात आदिपुरुष प्रदर्शित करू शकणार नाहीत. आदिपुरुषची आशेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हा खरोखरच मोठा धक्का आहे.

फॅन्सना धक्का

अनेक चाहत्यांनी ट्विटरवर दिग्दर्शक ओम राऊत आणि टी-सीरीजचा निर्माता भूषण कुमार यांना चित्रपट IMAX स्क्रीन मध्ये प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, त्यावर अजून कोणतेही अपडेट आलेले नाही. आदिपुरुषच्या आयमॅक्स रिलीझमध्ये काही बदल होतील की नाही याची प्रतीक्षा करावी लागेल.

अनेक फॅन्सनी ट्विटरवर IMAX ला टॅग करून हॉलिवूडच्या flash सिनेमासोबत आदिपुरुषला समान स्क्रीन द्याव्यात याची विनंती केलीय.

आदिपुरुष सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंग, बजरंगच्या भूमिकेत देवदत्त नागे,

मेघनाधाच्या भूमिकेत वत्सल शेठ, सोनल चौहान आणि तृप्ती तोरडमल यांच्या भूमिका आहेत. हा एक मोठा बजेट चित्रपट आहे, जो उच्च VFX ने सजला आहे. 16 जूनला आदिपुरुष थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मृत्यू डोळ्यासमोर, पण घाबरला नाही; १० जणांचा जीव घेणाऱ्या हल्लेखोराची बंदूक हिसकावली अन्...; धाडसी हिरोचं शौर्य व्हिडिओत कैद

Latest Marathi News Live Update: वानखेडे स्टेडियमवर 'प्रोजेक्ट महादेवा' चा शुभारंभ, लिओनेल मेस्सीची उपस्थिती

Mumbai Railway Station: दादर स्‍थानकावर नवी मार्गिका; प्लॅटफॉर्म ८ लवकरच सुरू होणार; गाड्यांची संख्याही वाढणार

Yoga for Women: महिलांनी घरकामाला व्यायाम समजणं चुकीचे; रोजच्या जीवनात 'या' सोप्या योग पद्धतीचा सराव करा

Winter Session 2025: नवख्या आमदारावर Devendra Fadanvis भयंकर चिडले, बघा काय म्हणाले? | Sakal News

SCROLL FOR NEXT