Adipurush Controversy  esakal
मनोरंजन

Adipurush Controversy : 'आदिपुरुष भंगार, पठाण भंगार पण याच सगळ्यात...'

मराठी चित्रपट, नाटक यामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या शशांक केतकरची फेसबूक पोस्ट चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adipurush Om Raut Director Controversy Shashank Ketkar : प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट भलताच चर्चेत आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावरुन वाद होणार असे म्हटले जात होतेच. आता तो प्रदर्शित होताच वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे.यावर वेगवेगळे सेलिब्रेटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठी चित्रपट, नाटक यामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या शशांक केतकरची फेसबूक पोस्ट चर्चेत आली आहे. ती पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. शशांकनं आदिपुरुषवरुन जो वाद होतो आहे त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या त्या पोस्टवर त्याला नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

राऊत यांचा आदिपुरुष दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. मात्र या दोन दिवसांतच या चित्रपटानं चाळीस कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यावरुन तो वादही झाला आहे. त्या चित्रपटातील पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद,सादरीकरण, अभिनय आणि एकुणच चित्रपटाचा कालावधी यावरुन नेटकऱ्यांनी दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यावर सडकून टीका केली आहे. सोशल मीडियावर देखील याबाबत वेगवेगळे मीम्स व्हायरल होताना दिसत आहे.

अशातच शशांकची पोस्टही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. फेसबूकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये शशांक म्हणतो, आदिपुरुष भंगार, पठाण भंगार, मान्य. सगळ्या प्रेक्षकांचं मत मला शंभर टक्के मान्य आहे. पण मग याचा अर्थ हाच का, की आता फिल्म्ससाठी पण टेलिव्हिजनचेच लॉजिक वर्क होणार आहे का? लोक शिव्या घालतायत पण बघतात ना, धंदा होतोय ना? अशा शब्दांत शशांकनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आदिपुरुषवरुन होणारा वाद पाहता आता त्या चित्रपटाचे संवाद लेखक मुंताशिर यांनी त्या चित्रपटावरुन प्रतिक्रिया दिली आहे.याशिवाय मेकर्स या चित्रपटातील संवाद आता बदलणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. एकुणच या चित्रपटावरुन वादही मोठ्या प्रमाणवर होत असला तरी दुसरीकडे तो चित्रपट पाहण्यासाठी होणारी गर्दीही मोठी असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT