Adipurush Star Prabhas in Ramleela,Delhi Instagram
मनोरंजन

Prbhas In Ramleela: दिल्लीत लाल किल्ल्यावर असं पहिल्यांदाच घडणार...साउथ स्टार करणार रावणाचं दहन

दिल्लीत लाल किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या रामलीला सोहळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

Prbhas in Ramleela: दिल्लीत रामलीला आणि दसरा मोठ्या धामधुमीत साजरे केले जाणारे सण आहेत. दरवर्षी दिल्लीत अनेक ठिकाणी भव्य रामलीला कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि या सोहळ्यात मोठमोठे कलाकार आणि नेतेमंडळी उपस्थित असतात. यावेळी दिल्लीतील लव कुश रामलीला खास ठरणार आहे, कारण या कार्यक्रमात रावणाचं दहन साऊथ सुपरस्टार प्रभासच्या हस्ते केलं जाणार आहे. प्रभास यावेळी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचं दहन करणार असल्याचं समोर आलं आहे.(Adipurush Star Prabhas in Ramleela, Delhi)

लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितलं की या कार्यक्रमात भारताच्या प्रथम नागरीक राष्ट्रपती दौपदी मुर्मु देखील उपस्थित राहणार आहेत. पण आता बातमी समोर येतेय की राष्ट्रपतींचे या सोहळ्यासाठी येणं निश्चित नाही. त्यांच्या ऐवजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अर्जुन कुमार म्हणाले की,''येणारे सर्व दिग्गज पाहुणे मिळून रावण,कुंभकर्ण आणि मेघनाथाच्या पुतळ्यांचे दहन करतील. रामलीलेत असे एकंदरीत ९ पुतळे लावले जाणार आहेत''.

प्रभासला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्यामागे खास कारण आहे. प्रभासच्या 'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात तो राघव म्हणजे भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जानकीच्या भूमिकेत कृति सनन आणि लंकेशची व्यक्तिरेखा सैफ अली खान साकारताना दिसणार आहे. सिनेमाचा टीझर अयोध्येत रिलीज केला गेला होता आणि म्हणूनच कदाचित प्रमुख अतिथि म्हणून प्रभासला बोलावलं गेलं असेल.

तर, सिनेइंडस्ट्रीतील जाणकारांचे म्हणणे आहे की असं पहिल्यांदाच घडत आहे जेव्हा कोणत्या साउथ स्टारला रामलीलेत रावणाचं दहन करण्यासाठी बोलावलं गेलं आहे. पण जेव्हापासून प्रभासचं नाव जाहीर झालंय तेव्हापासून लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. आतापर्यंत या सोहळ्यासाठी ५ लाखांहून अधिक पास वाटले गेलेयत. आणि आणखी २ लाख छापण्यास दिल्याचं देखील कळतंय. तसंच, आदिपुरुषच्या निर्मात्यांनी हिंदी जनेतमध्ये सिनेमा विषयी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं म्हणूनही ही स्ट्रॅटेजी राबवल्याचं बोललं जात आहे.

यावेळी लवकुश समितीनं निर्णय घेतला आहे की ते कोणत्याही प्रकारची आतिषबाजी या सोहळ्यात करणार नाहीत. तसंच,पुतळ्यांमध्ये केवळ सुकं गवत भरलं जाईल. जेव्हा पुतळ्यांचे दहन केले जाईल तेव्हा स्पीकरच्या माध्यमातून फटाक्याचे आवाज वाजवले जातील कारण लोकांना यामुळे वेगळा आनंद अनुभवता येईल आणि पर्यावरणाची देखील हानी होणार नाही. तसंच, दिल्लीतील वाढतं प्रदुषण यामुळे आधीपासनंच फटाक्यांवर बंदी आणण्यात आणली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''मराठा नेते, अधिकारी, उद्योगपतींना बावनकुळे त्रास देत आहेत'', ओबीसी बैठकीनंतर जरांगेंचा हल्ला

Jan Dhan Account: जन धन खात्यांवरही 'या' सुविधा मिळणार, आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर...

Korewadi Protest : राजश्री राठोड यांचे कोरडेवाडी तलाव मंजुरीसाठी आमरण उपोषण, ग्रामस्थांचा पाठिंबा; शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस

Rana Jagjit Singh Patil : भाजपाचे आमदार राणा पाटील यांचे विद्यमान आमदार व खासदार यांना शह देण्यासाठी परंडा मतदारसंघात दौरे

Ruturaj Gaikwad ने सूर मारला अन् जमिनीलगत अफलातून कॅच घेतला, विदर्भाचा डावही संपवला; पाहा Video

SCROLL FOR NEXT