adipurush starcast devdatta nage visit aasam cm along with bhushan kumar  SAKAL
मनोरंजन

Adipurush: मराठमोळ्या देवदत्त नागेची चांदी, आदिपुरुषच्या निर्मात्यांसोबत घेतली आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट

अशातच देवदत्तने आदिपुरुषच्या निर्मात्यांसोबत आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय.

Devendra Jadhav

Adipurush Movie News: आदिपुरुष सिनेमा अवघ्या काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. आदिपुरुषचा ट्रेलर, गाणी अशा अनेक गोष्टींची सध्या तुफान चर्चा आहे.

या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. मराठमोळ्या देवदत्त नागेची सध्या या सिनेमाच्या निमित्ताने बरीच चर्चा आहे. अशातच देवदत्तने आदिपुरुषच्या निर्मात्यांसोबत आसामच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय.

आदिपुरुषचे निर्माते आणि T सिरीजचे प्रमुख भुषण कुमार यांच्यासह देवदत्त नागेने आसामचे माननीय मुख्यमंत्री श्री हिमंता बिस्वसरमाजी यांची भेट घेऊन त्यांना आदिपुरुषचा ट्रेलर आणि गाणी दाखवली.

यावेळी भूषण कुमार यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसरमाजी यांना राम - लक्ष्मण - सीतेची मूर्ती भेट दिली. यावेळी सिनेमासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सिनेमाच्या टीम सोबत चर्चा केली.

आता आदिपुरुष हा चित्रपट रिलिज होण्यासाठी काहीच दिवस उरलेले आहे. त्यापुर्वी पुन्हा हा चित्रपट चर्चेत आला तो या चित्रपटाच्या रिलिजपुर्वीच केलेल कमाईमुळे.

अलीकडेच आदिपुरुषच्या कमाईशी संबंधित एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच 420 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

hindi.asianetnews या न्यूज पोर्टलमध्ये हा दावा करण्यात आला आहे. अहवालात सांगण्यात आल्याप्रमाणे चित्रपटाचे थिएटर हक्क 2 राज्यांमध्ये 170 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

इतकच नाही तर याशिवाय या चित्रपटाची ओटीटी डीलही पूर्ण झाली असून सर्व भाषांचे हक्क नेटफ्लिक्सने 250 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खानसह अनेक कलाकार दिसणार आहेत.

आदिपुरुष हा चित्रपट 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे, परंतु तो रिलीज होण्यापूर्वी अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada: सहकार क्षेत्रात मोठा चमत्कार! ९८ पैकी ९८ मतं एकाच उमेदवाराला! विरोधकांचा पूर्ण सुफळा साफ; संजना जाधव यांचा ऐतिहासिक विजय

Mumbai Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा रेड अलर्ट

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

'मी अनेक मुलींसोबत रिलेशनमध्ये होते' गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचा खुलासा, म्हणाली... 'मुलींसोबत इतकी इंटिमेट...'

SCROLL FOR NEXT