Adnan Sami reveals Pakistani establishments unruly behaviour Google
मनोरंजन

Adnan Sami: अदनान सामीनं का सोडलं पाकिस्तान?; म्हणाला,'सत्य ऐकाल तर धक्का बसेल...'

टी 20 वर्ल्डकप मध्ये इग्लंडच्या विजयानंतर सोशल मीडियावर अदनाननं इंग्लंडच्या संघाचे अभिनंदन केले अन् पाकिस्तानला सुनावले त्यावरनं मोठा वाद पेटला आहे.

प्रणाली मोरे

Adnan Sami: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी अनेकदा ट्वीटरवर भारत आणि पाकिस्तानी नेटकऱ्यांच्या वादात फसताना दिसतो. नुकत्याच झालेल्या टी २० वर्ल्डकप मध्ये इग्लंडच्या विजयानंतर सोशल मीडियावर अदनाननं इंग्लंडच्या संघाचे अभिनंदन करताना ट्वीटमध्ये लिहिलं आहे की सर्वोत्कृष्ट टीमचा विजय. यानंतर मात्र पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांनी अदनानला पुन्हा एकदा टार्गेट करायला सुरुवात केली आहे.(Adnan Sami reveals Pakistani establishments unruly behaviour)

आता हे प्रकरण थोडं पुढे पोहोचलं आहं आणि अदनानं ट्वीट करत पाकिस्तानी ऑथोरिटीवर आपला राग जाहिररित्या व्यक्त केला आहे. ट्वीटरवर एक लांबलचक पोस्ट लिहिताना त्यात म्हटलं आहे की, तो लवकरच पाकिस्तानविषयी काही मोठे खुलासे करणार आहे. त्याला पाकिस्तानकडून कशी अनेक वर्ष वाईट वागणूक मिळाली,आणि पाकिस्तान सोडण्याचं तेच कसं मोठं कारण होतं याविषयी तो सांगणार आहे. अर्थात त्यानं हे देखील नमदू केलं की त्याची पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांविषयी काहीच तक्रार नाही,तो त्या प्रत्येक व्यक्तीचा सम्मान करतो ज्याचं त्याच्यावर कलाकार म्हणून प्रेम आहे.

टी २० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराजय झाल्यानंतर रविवारी अदनानने ट्वीट करत लिहिलं आहे,''उत्कृष्ट संघ जिंकला. अभिनंदन इंग्लंड..हा फक्त खेळ आहे. दुसऱ्या लोकांच्या अपयशावर तिरकस बोलत आपली छाती बडवणाऱ्यांना ही चांगलीच शिकवण आहे''. आपल्या ट्वीटसोबत अदनानने पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली उडवताना दिवंगत बप्पी लहिरी यांच्या मेरे तो लग गए.. गाण्याची छोटीशी क्लीप शेअर केली.

या ट्वीटनंतर पाकिस्तानी चाहत्यांनी अदनाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आणि म्हणाले,'त्याचा देशाप्रती आपण एकनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे'. यापैकीच एका ट्वीटला उत्तर देत अदनानने लिहिलं आहे की,''माझी एकनिष्ठता फक्त केवळ एका देशाप्रती आहे आणि तो आहे भारत. दुसरीकडे तुम्ही लोक मात्र मला कन्फ्यूज वाटत आहात- कधी तुमची ईमानदारी तुमच्या झेंड्याप्रती असते तर कधी आर्मीप्रती?, (आर्मीनं तर तुम्हाला उद्ध्वस्त केलं आहे),कधी युएसए साठी,कधी चीन साठी तर कधी सौदीसाठी? तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या मनातही यावरनं गोंधळ उडालेला असणार''.

अदनानच्या या ट्वीटनंतर ट्वीटरवर वाद चिघळला आणि पाकिस्तानच्या समर्थकांनी अदनानला टार्गेट करायला सुरुवात केली. यानंतर अदनाननं देखील लांबलचक पोस्ट शेअर करत तिखट शब्दात पाकिस्तानी चाहत्यांवर वार केले.

Adnan Sami tweet

ट्वीटरवर नोट शेअर करत अदनानने लिहिले आहे, ''खूप लोक मला विचारतात की मी पाकिस्तानचा इतका राग का करतो? सत्य हे आहे की पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांविषयी माझ्या मनात तिळमात्र राग नाही,ज्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. मी त्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो ज्याचं माझ्यावर प्रेम आहे-बस्स एवढंच मला सांगायचे आहे. मला तिथल्या काही संस्थांनी खूप त्रास दिला, जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की मला तिथल्या प्रथितयश लोकांनी किती त्रास दिला. शेवटी मला पाकिस्तान सोडावं लागलं. एक दिवस लवकरच मी त्याचा खुलासा करणार आहे. माझ्यासोबत कोण कसं वागलं हे अनेकांना माहित नाही. सर्वसामान्यांना तर याची कल्पनाच नाही. त्यामुळे मी जे सांगेन त्यानं अनेकांना धक्का बसेल. गेली अनेक वर्ष मी शांत राहिलो,पण आता एक योग्य वेळ पाहून मी सत्य समोर आणेन...''

Adnan Sami reveals Pakistani establishments unruly behaviour

लंडनमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अदनान सामीचे वडील अर्शद सामी हे पाकिस्तानी एअर फोर्समध्ये पायलट होते. अनेक वर्ष ते पाकिस्तानी नागरिक म्हणून ओळखले गेले. अदनानने लंडन नंतर भारतात आपल्या सांगितिक करिअरला एक वेगळी दिशा दिली. बॉलीवूडमध्ये देखील अदनान सक्रिय होता. २०१५ मध्ये आपला पाकिस्तानी पासपोर्ट एक्स्पायर झाल्यानंतर त्याने भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला. १ जानेवारी,२०१६ पासून तो एक भारतीय नागरिक म्हणून ओळखला जाऊ लागला. २०२० मध्ये भारत सरकारनं अदनान स्वामीला 'पद्म श्री' पुरस्कारानं सम्मानित केलं. ज्यानंतर सोशल मीडियावर अदनानला पाकिस्तानी नेटकऱ्यांनी टार्गेट करायला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT