मनोरंजन

पूनम पांडे, शर्लिन चोप्रा दोघींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

पूनम पांडे, शर्लिन चोप्रा दोघींना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश Adult Star Poonam Pandey Sherlyn Chopra gets relief as Mumbai High Court restrict crime branch police to take any strict actions against both actress

विराज भागवत

- तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra Case) याला अश्लील व्हिडीओ आणि वेब सिरीज (Pornography) बनवल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर अश्लील कंटेंट बनवल्या जाणाऱ्या अनेक अँप्सवर तातडीने बंदी घातली गेली. या कारवाई दरम्यान, अडल्ट व्हिडीओ बनवणाऱ्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांची नावं या प्रकरणात घेण्यात आली. त्या दोघींनाही राज कुंद्राने त्याच्या अश्लील व्हिडीओत काम करण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे या दोघीही क्राईम ब्रांचच्या रडारवर होत्या. पण, त्यांना मुंबई हायकोर्टाने काही अंशी दिलासा दिला असून त्यांच्याविरोधात लगेच कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. (Adult Star Poonam Pandey Sherlyn Chopra gets relief as Mumbai High Court restrict crime branch police to take any strict actions against both actress)

राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोघींनाही गुन्हे शाखेने चौकशीसाठी समन्स बजावल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे या दोघींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्याला अटक होऊ शकते या भीतीने दोघींनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना हायकोर्टाने या दोघींना तूर्तास दिलासा दिला. 20 सप्टेंबरपर्यंत या दोघींवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना कोर्टाने दिले.

गेल्या आठवड्यापासून राज कुंद्रा प्रकरणात अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. काहींवर गंभीर आरोपही करण्यात आले. अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे यांना आपल्या अश्लील चित्रपटात काम करण्याची ऑफर राज कुंद्राच्या कंपनीने दिली होती. पण या दोघींनीही ती ऑफर नाकारली, त्यावेळी त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांना देण्यात आली. याच मुद्द्यावरून चर्चांना उधाण आल्याने गुन्हे शाखेने या दोघींना चौकशीसाठी बोलावून घेतल्याचे सांगण्यात आले. पण चौकशीआधीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याने या दोघींना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpalwandi Leopard News : पिंपळवंडीत बिबट्याचा थरार संपला! थर्मल ड्रोनच्या निगराणीनंतर अखेर 'सहा वर्षांचा' बिबट्या पिंजऱ्यात कैद

New IPO : IPO अलर्ट! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! वर्षातील अखेरचा IPO आजपासून सुरू; जाणून घ्या प्राइस रेंज, GMP आणि डिटेल्स

Navi Mumbai Airport: विमानसेवा सुरू, नेटवर्क गायब! नवी मुंबई विमानतळाची दूरसंचार कंपन्यांवर दरवाढ

मी चुकले! या विषयावर बोलण्याचा मला अधिकार नाहीये... जितेंद्र जोशीच्या पत्नीने मागितली माफी; कारण...

Latest Marathi News Update : सोलापुरात शिंदेसेना,काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद

SCROLL FOR NEXT