Adwait Dadarkar  
मनोरंजन

अग्गंबाई सुनबाई: मालिकेचा शेवटचा सीन करताना अद्वैत भावूक

'सोहम साकारताना सगळेच अनुभव आले. प्रचंड ट्रोलिंग, नकारात्मक प्रतिक्रिया.. बरोबर खूप कौतुक आणि प्रेमसुद्धा'

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सुनबाई' Aggabai Sunbai ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेचा हा दुसरा भाग होता आणि त्यातील काही कलाकार बदलले होते. अभिनेता अद्वैत दादरकरने Adwait Dadarkar मालिकेत सोहमची नकारात्मक भूमिका साकारली. तर अभिनेत्री उमा पेंढारकर ही शुभ्राच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील सोहमचा शेवटचा सीन साकारताना अद्वैतला भावना अनावर झाल्या. भूमिकेला शेवटचा निरोप देताना सोशल मीडियावर त्याने भावनिक पोस्ट लिहिली.

अद्वैत दादरकरची पोस्ट-

माझ्या कॅरेक्टरचा लास्ट शॉट. सोहम कुलकर्णी, मला तुझी खूप आठवण येईल. आयुष्यात पहिल्यांदा निगेटिव्ह रोल. सगळेच अनुभव आले. प्रचंड ट्रोलिंग, नकारात्मक प्रतिक्रिया..बरोबर खूप कौतुक आणि प्रेमसुद्धा. दुष्ट माणूस स्वतः साठी कधीच दुष्ट नसतो. लोकांसाठी असतो. त्यामुळे मुद्दाम दुष्टपणा सादर न करता समाजाच्या दृष्टीने चुकीची मतं, तत्व आणि वागणं असलेला 'माणूस' करण्यावर भर दिला. मला खलनायक असणं आवडतंय. खलनायक अधिक रोमांचक असतात, हे जुड नेल्सनचं म्हणणं जास्त पटलं. खरंच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करता आलं. निवेदिता सराफ, गिरीश ओक, मोहन जोशी.. तुम्हा तिघांबरोबर काम करणं खरंच मला ॲक्टर म्हणून ग्रो करणारं होतं. उमा पेंढारकर.. आपले सीन्स करणं सर्वांत अवघड होतं माझ्यासाठी. कारण आपल्या संपूर्ण टीममध्ये सर्वात चांगलं नातं आणि मैत्री तुझ्याशी झाली. पण ऑनस्क्रीन ते दिसणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे तुझ्याबद्दल तिरस्कार, द्वेष, मत्सर आणणं हे ॲक्टर म्हणून आव्हानात्मक होतं. पण आपलं अॅक्शन रिअॅक्शनचं ट्युनिंग उत्तम जमलं. म्हणून शक्य झालं. (लालितकलादर्श पणा जपून ठेव)

'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेला प्रेक्षकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळू शकला नाही. मालिकेचा टीआरपी वाढत नसल्याने निर्मात्यांनी अखेर ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच झी मराठी वाहिनीवरील इतरही काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. यामध्ये माझा होशील ना या मालिकेचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT