mahabharat serial  
मनोरंजन

मालिकांची वाढती लोकप्रियता, ही खासगी वाहिनी दाखविणार पुन्हा 'महाभारत'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दूरदर्शनवर तब्बल तीस वर्षांपूर्वी रामायण आणि महाभारत या पौराणिक-धार्मिक मालिका खूप लोकप्रिय ठरल्या होत्या. बी. आर. चोप्रा यांनी 'महाभारत' ही मालिका बनविली होती तर रामानंद सागर यांनी रामायण ही मालिका आणलेली होती. त्यावेळी या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्याच कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिका लागल्या की रस्ते सुनसान व्हायचे...महिला वर्ग तर हातातील काम बाजूला सारुन टीव्हीसमोर बसायचा. खूप मोठी क्रेझ या मालिकांची होती. आता बराच काळ लोटला असला तरी लॉकडाऊनमध्ये या दोन्ही प्रसिद्ध मालिका पुन्हा दाखवण्याची मागणी प्रेक्षक करत होते. 

मग काय दुरदर्शन वाहिनीने देखील प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता रामायण, महाभारत मालिका पुन्हा प्रसारित केली. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षानंतर या मालिका प्रसारित झाल्या अन् प्रेक्षकांनी या मालिकांवर भरघोस प्रेम केलं. रामायण मालिकेने तर जागितक विक्रम केला. इतकंच काय तर खाजगी वाहिन्यांनी देखील या मालिका आपल्या वाहिन्यांवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

एवढेच नाही तर या मालिकांमुळेच दूरदर्शन सध्याची नंबर वन वाहिनी ठरली आणि रामायण ही मालिका पहिल्या क्रमांकाची लोकप्रिय मालिका ठरली. मागील पिढीने आणि आताच्या पिढीनेही या मालिकांचा मनसोक्त आस्वाद घेतला. या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची पुन्हा चर्चा सुरू झाली. यातील कलाकारांनीही पुन्हा आपापल्या घरीच या मालिकांचा आस्वाद घेतला. त्यानंतर काही खासगी वाहिन्यांवरही या मालिकांचे पुनःप्रसारण सुरू झाले.

कलर्स हिंदीवर सध्या महाभारत सुरू आहे तर स्टारवर रामायण. आता पुन्हा एका खासगी वाहिनीवर महाभारत या मेगा मालिकेचे पुनःप्रसारण करण्यात येणार आहे. लाॅकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढलेला आहे आणि लोकांचे मनोरंजन व्हावे...अशा धार्मिक-पौराणिक मालिकांतून मिळणारा सकारात्मक संदेश आचरणात आणावा याकरिता स्टार भारत या वाहिनीने १८ मेपासून ही मेगामालिका पुन्हा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. दरोज रात्री आठ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.   

after doordarshan mahabharat will get telecast on star bharat

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

Mahavitaran Recruitment : विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; ६ व ७ नोव्हेंबरला कागदपत्रांची पडताळणी

Kolhapur Election : 'पदवीधर'ची बाजारात 'तुरी', महायुतीत वादाची 'धुरी'; मंत्री चंद्रकांत पाटील-हसन मुश्रीफ यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा

Raju Shetti: ‘दालमिया’कडून एफआरपीमध्ये मोडतोड: राजू शेट्टी : उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

Latest Marathi News Live Update : निवडणुकांमुळं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढं जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT