Aparna Balamurali Esakal
मनोरंजन

Aparna Balamurali: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्रींसोबत गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्याचे निलंबन

Vaishali Patil

Student Misbehaves With Aparna Balamurali: कन्नड अभिनेत्री अपर्णा बालमुरली हिचा लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये सामावेश होतो. आपल्या दमदार अभिनयाने तिने लोकांच्या हृदयात घर केलं आहे. सध्या अपर्णा तिच्या मल्याळम चित्रपट 'थंकम'मुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, अपर्णाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओत एक मुलगा तिच्यासोबत असभ्य वर्तन करताना दिसत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अपर्णा बालमुरली तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केरळ एर्नाकुलम लॉ कॉलेजमध्ये होती.

या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यास सांगितले आणि त्या व्यक्तीने तिच्या परवानगीशिवाय अभिनेत्रीला स्पर्श करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याने अपर्णाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिची पाठ थोपटू लागतो.तो हे एकदा नाही तर दोनदा करतो. ज्यानंतर अभिनेत्री अस्वस्थ होते आणि त्या त्याच्यापासून दूर झाली.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

घटनेच्या काही तासांनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स नाराजी व्यक्त करत होते. अपर्णाचे चाहते विद्यार्थ्यावर कठोर कारवाईची मागणी करत असताना, एर्नाकुलम लॉ कॉलेज युनियनने आधी अपर्णाची माफी मागितली आणि नंतर विद्यार्थ्याला कॉलेजमधून निलंबित केले.

थँकम चित्रपटाचे दिग्दर्शन साहीद अराफत यांनी केले आहे. या चित्रपटात अपर्णा बालमुरली, विनीत श्रीनिवासन यांच्याशिवाय गिरीश कुलकर्णी आणि बिजू मेनन सारखे स्टार्स दिसणार आहेत. 'Thankum' 26 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT