after subhedar digpal lanjekar new movie Shivrayancha Chhava released on feb 2024 SAKAL
मनोरंजन

Shivrayancha Chhava: सुभेदार नंतर दिग्पाल लांजेकरांचा नवीन सिनेमा, 'शिवरायांचा छावा' सिनेमाची घोषणा

सुभेदार नंतर दिग्पाल लांजेकरांनी नवीन सिनेमाची घोषणा केलीय

Devendra Jadhav

Shivrayancha Chhava Marathi Movie: सुभेदार सिनेमा बॉक्स ऑफीसवर प्रचंड गाजला. सुभेदार सिनेमाने चांगला गल्ला जमवला. अशातच दिग्पाल लांजेकरांनी शिवराज अष्टकच्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली.

शिवरायांचा छावा असं या सिनेमाचं नाव असुन या सिनेमाची घोषणा आज नुकतीच करण्यात आलीय.

शिवरायांच्या छावा सिनेमाची घोषणा

दिग्पाल लांजेकर यांनी आज सोशल मिडीयावर शिवरायांच्या छावा सिनेमाची घोषणा केली. सुभेदार नंतर शिवरायांचा छावा हा दिग्पाल लांजेकर यांचा शिवराज अष्टक मधील सहावा सिनेमा असेल.

उजळला तेजाने, पुरंदराचा माथा सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा, शत्रू होई परास्त

असा ज्याचा गनिमी कावाशिवशंभूचा अवतार जणूअवतरला 'शिवरायांचा छावा'

छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा!'
सादरकर्ते, श्री शिवराज अष्टकाचे लेखक दिग्दर्शक श्री दिग्पाल लांजेकर आणि मल्हार पिक्चर कंपनी. अशी पोस्ट करत दिग्पाल लांजेकर यांनी शिवरायांचा छावा सिनेमाची घोषणा केलीय.

या तारखेला 'शिवरायांचा छावा' सिनेमा मोठ्या पडद्यावर दिसणार

शिवरायांचा छावा सिनेमा पुढच्या वर्षा म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर तर जिजाऊसाहेबांच्या भुमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकणार आहेत.

याशिवाय विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, भूषण विनतरे, अमित देशमुख असे कलाकार झळकणार आहेत. सिनेमात संभाजी महाराजांची भुमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT