Uddhav Thackeray vs Aroh Welankar esakal
मनोरंजन

'महाराष्ट्राची जनता जिंकली'; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अभिनेत्याचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय.

उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray Resigns) मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा सुपूर्द केलाय. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाचा आता दुसरा अंक सुरू होणार आहे.

बुधवारी सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिलेल्या निर्णयानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा सत्तासंघर्ष सुरू असताना अनेक घडामोडींवर ट्वीटद्वारे सतत प्रतिक्रिया देणारा अभिनेता आरोह वेलणकर (Actor Aroh Welankar) यानं मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ट्वीट केलंय.

'महाराष्ट्राची जनता जिंकली' असं ट्वीट आरोहनं केलंय. हे ट्वीट केल्यानंतर त्याला अनेकांनी पाठिंबा दिलाय, तर बऱ्याच जणांनी त्याला ट्रोल देखील केलंय. याआधी अभिनेता आरोह वेलणकर एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता, की शिवसेनेनं (Shiv Sena) एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे. मग, एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केलं आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे, ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळं आहे. त्यामुळं त्यानींही शिवसेनेला भरभरून दिलंय, असं आरोह म्हणाला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आपल्या सर्वांच्या सहकार्यानं वाटचाल केली. सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्यांना कर्जाच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा बीड पॅटर्न सुरु केला. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं. उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतर केलं. सर्व चांगलं सुरु असताना काही जणांची नजर लागली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे सोनिया गांधी यांचे आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT