after watching maharashtra shaheer movie trailer ankush chaudhari wife deepa parab reaction sakal
मनोरंजन

Ankush chaudhari: तीन वर्ष बाथरुममध्येही तो.. अंकुश चौधरीच्या बायकोने सर्वांसमोरच सांगितला 'तो' किस्सा..

‘महाराष्ट्र शाहीर’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अंकुशच्या बायकोने, दीपाने सांगितली पडद्यामागची गोष्ट..

नीलेश अडसूळ

ankush and deepa chaudhari: सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. सध्या अंकुशची बरीच चर्चा आहे. कारण त्याचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या चित्रपटात तो शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाला. या सोहळ्याला त्याची बायको.. अभिनेत्री दीपा परब चौधरी देखील उपस्थित होती. सध्या ती देखील 'झी मराठी' वरील 'तू चाल पुढं' या कार्यक्रमामुळे भलतीच चर्चेत आहे. त्यामुळे अंकुश सोबत दीपानेही सर्वांचे लक्ष वेधले.

यावेळी माध्यमांनी दीपाला काही प्रश्न विचारले, ज्यावर दीपाने अंकुशच्या काही खास गोष्टी माध्यामांसमोर सांगितल्या.

(after watching maharashtra shaheer movie trailer ankush chaudhari wife deepa parab reaction)

दीपाने यावेळी अंकुश चौधरीच भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली, ''गेल्या तीन वर्षांपासून अंकुश या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. ढोलकी वाजवण्याची कलाही त्याने आत्मसात केली. शिवाय त्याच्या लूकवर विशेष मेहनत घेतली.''

''अंकुशने वजन जेव्हा कमी केलं तेव्हा सगळे विचारत होते, तू वजन कमी का केलं?. मात्र त्यावेळी आम्ही कोणालाच काही सांगितलं नाही. ढोलकी वाजवायला तो शिकला. गाणी गायचा. बाथरुममध्येही तो गाणी गात होता. आम्ही विचार करायचो की, याचं नेमकं काय सुरू आहे? पण त्याने आम्हालाही काही कळू दिलं नाही.''

पुढे दीपा म्हणाली, ''मलाही 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाबाबत आधी काहीच माहित नव्हतं. जेव्हा मला केदारचा फोन आला तेव्हा त्यांनी मला या चित्रपटाबाबत सांगितलं. अंकुश स्वतःहून कोणती गोष्टी सांगत नाही हा त्याचा स्वभाव आहे. पण तीन वर्षे त्याने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो याच गोष्टीच्या पाठी होता. सतत या चित्रपटाचाच विचार तो करत होता. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिल्यानंतर त्याची मेहनत माझ्या डोळ्यासमोरुन गेली. त्याने खूप कष्ट केले आहेत.'' आशा शब्दात दीपाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral

Latur to Badlapur: लातूर ते मुंबई प्रवास फक्त ५.५ तासांत होणार! कोकण–मराठवाड्याला थेट जोडणारा हाय-स्पीड हायवे मंजूर, पाहा मार्ग

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

SCROLL FOR NEXT