Tejashri Pradhan
Tejashri Pradhan 
मनोरंजन

'अग्गंबाई सासूबाई'नंतर तेजश्री प्रधानची नव्या मालिकेत एण्ट्री

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'फुलाला सुगंध मातीचा' (Phulala Sugandha Maticha) ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत लवकरच एका नव्या अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील 'शुभ्रा' म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आहे. शिर्डीमधल्या आनंद जत्रेत अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कीर्ती सहभागी होणार असून या स्पर्धेचं सूत्रसंचालन तेजश्री प्रधान करणार आहे. तेजश्री सेलिब्रिटी होस्ट म्हणून या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना तेजश्री प्रधान म्हणाली, ‘फुलाला सुगंध मातीचा हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या मालिकेत मी तेजश्री प्रधान म्हणूनच एण्ट्री घेणार आहे. खूप दिवसांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करते आहे त्यामुळे उत्सुकता आहे. मालिकेत मी एका अनोख्या स्पर्धेचं सूत्रसंचालन करणार आहे. ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली आणि खास बात म्हणजे माझा या मालिकेतला लूक खूप विचारपूर्वक डिझाईन करण्यात आला आहे. कीर्तीच्या प्रवासात तिला तेजश्री प्रधानची साथ कशी मिळणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.’

शिर्डीमध्ये भरवण्यात आलेली अष्टपैलू व्यक्तिमत्व ही स्पर्धा कीर्तीसाठी अतिशय महत्त्वाची असून यानिमित्त्ताने तिच्या बुद्धीमत्तेची आणि हजरजबाबीपणाची कसोटी लागणार आहे. कीर्ती ही स्पर्धा जिंकणार का, तेजश्री तिला कशी मदत करणार, हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल. फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT