aishwarya narkar reply to netizens who troll her dance video marathi actress SAKAL
मनोरंजन

Aishwarya Narkar: बाळा तुला सद्बुद्धी नाही दिली?? ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी दिले रोखठोक उत्तर

ऐश्वर्या नारकर यांना डान्स व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केलंय

Devendra Jadhav

Aishwarya Narkar Video News: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ऐश्वर्या यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय

ऐश्वर्या सोशल मीडियावर त्यांचे विविध फोटोशूट आणि डान्स रील व्हिडिओ शूट करत असतात. ऐश्वर्या यांनी काही दिवसांपूर्वी एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर नेटकऱ्यानी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. ऐश्वर्या यांनी सुद्धा ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सना रोखठोक उत्तर दिलंय.

झी मराठी पुरस्कार सोहळा 2023 साठी ऐश्वर्या यांनी खास डान्स रिहर्सल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याखाली त्यांनी Dance is a real struggle असं कॅप्शन लिहिलं.

या व्हिडिओवर ऐश्वर्या यांना एकाने कमेंट केली की, म्हातारपणात डान्स करणं अवघडच असतं ऐश्वर्या यांनी त्याला रिप्लाय दिला, तुम्ही करूच नका

आणखी एकाने कमेंट केली की, आजी देव देव करा, त्यावर ऐश्वर्या यांनी त्याला रिप्लाय दिला, अरे बाळा तुला सद्बुद्धी दिली नाही का तुझ्या देवाने?

अशाप्रकारे ऐश्वर्या यांनी नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

एका कमेंटने मात्र लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे, किती postive comment आहे मॅम तुमच्या video आणि फोटोवर. तुम्ही वाईट comment वाल्यांना reply देत आहात. त्याची हिंम्मत वाढत आहे यामुळे. असं माझं मत आहे मॅम. काही चुकीच बोलो असले तर sorry

ऐश्वर्या आणि त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ शूट करत असतात. दोघांच्याही रिल्सना नेटकरी अनेकदा टीका करताना दिसतात. पण अविनाश - ऐश्वर्या ट्रोलींगकडे दुर्लक्ष करताना दिसतात. याशिवाय काहीवेळेस ऐश्वर्या ट्रोलिंग करणाऱ्यांना चांगलंच सुनावताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT