Abhishek Bachchan & Aishwarya Rai-Bachchan Google
मनोरंजन

लग्नानंतर 'मिसेस बच्चन' हाक ऐकून घाबरलेली ऐश्वर्या राय; काय होतं कारण?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न २००७ साली झालं होतं,त्यांच्या लग्नासा १५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अभिषेकनं एक आठवण शेअर केली आहे.

प्रणाली मोरे

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत असतं. लग्न करताना म्हणूनच अनेकदा खुप विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. लग्नानंतर केवळ एका व्यक्तीशी नाही तर त्याच्याशी संबंधित कुंटुंबातील अनेकांशी नातं जोडलं जात. त्यामुळे जबाबदारीची जाणीव आणि नात्यातली तडजोड या गोष्टी लग्नात खूप महत्त्वाच्या ठरतात. एक मात्र आहे की लग्नानंतर पुरुष-स्त्री दोघांच्या आयुष्यात खूप घडामोडी होणाऱ असल्या तरी स्त्रीच्या आयुष्यावर लग्नाचा अधिक प्रभाव पडलेला दिसून येतो.

आता हे फक्त सर्वसामान्यांच्या आयुष्यापुरतं मर्यादित असेल तर असं मुळीच नाही,अगदी सेलिब्रिटींच्या आयुष्यावरही याचा परिणाम होतोच. आता ही गोष्ट कोणापासून लपून राहिली नाही की ऐश्वर्या राय(Aishwarya Rai-Bachchan) बच्चन कुटुंबाची लाडकी सून आहे. ऐश्वर्याचंही सासू जया बच्चन(Jaya Bachchan) आणि सासरे अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत खास नातं आहे. ऐश्वर्यानं कुटुंबातील सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. आता ही गोष्ट वेगळी आहे की,लग्नानंतर पहिल्यांदा ऐश्वर्याला 'मिसेस बच्चन' म्हणून कुणीतरी हाक मारली तेव्हा ती गोंधळली होती.

ऐश्वर्यानं आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की'' मी आणि अभिषेक(Abhishek Bachchan) लग्न झाल्यावर हनीमूनसाठी बोरा-बोरासाठी विमानानं निघालो होतो. त्यावेळी विमानात प्रवासात मला पहिल्यांदा 'मिसेस.बच्चन' म्हणून संबोधलं गेलं तेव्हा मला सुरुवातीला काहा कळलंच नाही. पण नंतर लक्षात आलं,आता माझं लग्न झालं आहे आणि मी मिसेस.बच्चन झाले आहे. आता हे फक्त ऐश्वर्याच्या बाबतीच नाही तर अगदी कुणाही इतर मुलीच्या बाबतीत घडू शकतं. लग्नानंतरचे हे बदल मुलींना बऱ्याचदा गोंधळात टाकतात पण यांची पुढे सवय लागते आणि मग प्रत्येक मुलगी त्यात समरसून जाते.

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला १५ वर्ष झाली आहेत. त्या दोघांनी २००७ साली लग्न केलं होतं. त्यांना आता एक मुलगी आहे,जिचं नाव त्यांनी आराध्या ठेवलं आहे. अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा सोहळा पूर्ण प्लॅन केला होता, अमिताभ यांनी आपल्या बंगल्यातच मुलाचं लग्न थाटामाटात पार पाडलं होतं. अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट मीडियानं कव्हर केली होती.

अभिषेक-ऐश्वर्या यांचं नातं गेल्या पंधरा वर्षात अधिकाधिक दृढ होताना सगळ्यांनी पाहिलं असेल. करिअरमध्ये चांगलं यश मिळत असूनही लग्नानंतर ऐश्वर्यानं घराला महत्त्व देत सिनेमात काम कमी केलं. आज ती खूप सिलेक्टिव्ह काम करते. मात्र आपलं घर आणि मुलीला ती अधिक वेळ देताना दिसते. अभिषेकही आपल्या बायकोचे म्हणजे ऐश्वर्याचे गोडवे गाताना नेहमीच दिसतो. आज पाहिलं तर ऐश्वर्या अभिषेकपेक्षा सगळ्याच बाबतीत वरचढ आहे पण असं असलं तरी अभिषेक अनेकदा म्हणताना दिसलाय की त्याला आपल्या बायकोचा अभिमान आहे. आणि तिला पाठिंबा देणं मी माझं कर्तव्य समजतो. तसंच, आपला भक्कम आधार ही ऐश्वर्या आहे,तिच्याशिवाय अनेक गोष्टी कसे आपण करू शकत नाही यावरही अनेकदा अभिषेकनं सांगितलेलं आहे.

अभिषेक-ऐश्वर्यानं 'गुरु','ढाई अक्षर प्रेम के', 'धूम २' अशा सिनेमातून एकत्र काम केले आहे. अभिषेकचा 'दसवी' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत यामी गौतम,निमरत कौर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर ऐश्वर्या मणिरत्नच्या 'पोन्नियीन सेल्वन' या सिनेमात दिसणार आहे. तिनं या सिनेमात दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्या असून ,हा सिनेमा काल्कि कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT