Aishwarya Rai bachchan
Aishwarya Rai bachchan  esakal
मनोरंजन

Cannes Festival: ऐश्वर्याला सोडून आराध्याकडं नजरा! चाहते म्हणे, 'आईपेक्षा...'

युगंधर ताजणे

Cannes Film Festival: विश्वसुंदरीचा किताब मिळवणाऱ्या ऐश्वर्याचे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. तिचं लावण्य हे वेगवेगळ्या (Bollywood Movie) चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आले आहे. ऐश्वर्या ही अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांना, महोत्सवांना हजेरी लावत असते. अशावेळी तिची एक (Aishwarya Rai) छबी टिपण्यासाठी फोटोग्राफर्स प्रयत्नशील असतात. गेल्या वर्षी तिचा कान्समधील लूक व्हायरल झाला होता. त्याला लाखो लाईक्स आणि कमेंट्स (Bollywood News) आल्या होत्या. जगातील अनेक सुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्याचा तो लूक खुलून दिसत होता. आता ऐश्वर्याचा एक हटके लूक समोर आला आहे. मात्र तिचं नव्हे तर तिच्या मुलीचं आराध्याचं (Aaradhya Bachchan) कौतुक नेटकऱ्यांनी केलं आहे. सोशल मीडियावर त्या दोघांचा तो फोटो व्हायरल झाला आहे.

ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांसमोर आला असून त्यामध्ये नेटकऱ्यांनी आराध्याचे कौतुक केले आहे. आराध्या आपल्या आईचा हात धरून मोठ्या दिमाखात त्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे. कान्स फेस्टिव्हलमध्ये मायलेकी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या फोटोंना चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. काही नेटकऱ्यांनी त्या फोटोवर भन्नाट कमेंटसही दिल्या आहेत. त्यामध्ये एकानं ऐश्वर्यापेक्षा तिची मुलगी सुंदर दिसत असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे. सध्या व्हायरल झालेला तो व्हिडिओ ऐश्वर्याच्या फॅन पेजवरुन शेय़र करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याचा सुंदर देखणं रुप आपल्याला पाहायला मिळतं. ऐश्वर्यानं त्या व्हिडिओमध्ये स्टायलिश वन शोल्डर गोल्डन ड्रेस परिधान केला आहे.

व्हायरल झालेला तो व्हिडिओ 2019 चा असून तो सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे तो चर्चेतही आला आहे. त्या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. एका नेटकऱ्यानं त्या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, ऐश्वर्या ही कमालीची गोड दिसते आहे. दुसऱ्या नेटकऱ्यांनं आराध्याला फ्युचर क्वीन अशी उपमाही दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT